शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दरवर्षी १८०० कॅन्सर रुग्णांची भर

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

शहरात दरवर्षी १८०० कॅन्सर रुग्णांची भर

शहरात दरवर्षी १८०० कॅन्सर रुग्णांची भर
- सुशील मानधानिया : महिलांना सर्वाधिक स्तनाचा कॅन्सर
(डॉ. सुशील मानधानिया यांचा फोटो रॅपमध्ये आहे)

नागपूर : शहरात दरवर्षी १८०० कॅन्सर रुग्णांची नव्याने भर पडत आहे. सध्या २९.१ टक्के महिलांना स्तनाचा कॅन्सर आहे. १४.८ टक्के महिलांना योनीमार्गाचा, तर ५.७ टक्के महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर आहे. ३५ ते ४५ वयोगटातील ५५ ते ६० टक्के पुरुषांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचे नोंदणीवरून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुशील मानधानिया यांनी आज पत्रपरिषदेत दिली.
कॅन्सर जनजागृती सप्ताह पाळला जात आहे, त्या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. मानधानिया म्हणाले, नागपुरातील अमेरिकेत महिलांसाठी वयाच्या चाळीशीनंतर मेमोग्राफी तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. भारतात मात्र लाजाळूपणा आणि इतर गैरसमजुतीमुळे महिला ही तपासणी करून घेण्यास पुढे येत नाहीत. कर्करोग दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात आल्यानंतर मात्र महिला तपासणीसाठी जातात. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. त्यामुळे चाळीशीनंतर मेमोग्राफी महिलांनी केलीच पाहिजे, असा महत्त्वपूर्ण सल्ला त्यांनी दिला.
ते म्हणाले, ४ हजार ५८० पुरुष आणि ४ हजार ८६७ महिला अशा एकूण ९ हजार ४४७ नागरिकांची तपासणी केली असता त्यात दरवर्षी १८८९ नवीन कर्करुग्ण आढळून आले. पुरुषांमध्ये तंबाखू, धुम्रपान, दारूचे व्यसन, लठ्ठपणा, पाश्चिमात्य जीवनशैली हे कर्करोग होण्यास महत्त्वाचे कारण आहे. महिलांमध्ये उशिरा झालेली लग्ने आणि त्यामुळे उतरत्या वयात झालेले मूल यामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढत असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. नागपुरातील २५ ते ३० वयोगटातील तरुण पिढीला कॅन्सरचा धोका आहे. ४५ ते ५० वयोगटातील पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगाचा धोका आहे. ८० टक्के रुग्ण आजार गंभीर अवस्थेला पोहोचल्यानंतर डॉक्टरकडे जातात. अशावेळी रुग्ण बचावण्याची शक्यता कमी होत जाते. त्यामुळे कॅन्सरबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.