सध्याच्या दिवसात टीबी हा कोरोना व्हायरसइतकाच संसर्गजन्य होतोय? तज्ज्ञ सांगतात की...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 05:22 PM2021-03-25T17:22:52+5:302021-03-25T17:33:17+5:30

टीबीला ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते आणि जगभरात दरवर्षी १ कोटी व्यक्तींना या आजाराची लागण होते. त्यापैकी १५ लाख व्यक्तींचा दर वर्षी मृत्यू होतो. टीबीच्या जगभरातील एकूण रूग्णांपैकी 27% रुग्ण भारतात आहे आणि दर दिवशी १४०० टीबी रुग्णांचा मृत्यू होतो.

Is TB as contagious as the corona virus? Know Experts openion | सध्याच्या दिवसात टीबी हा कोरोना व्हायरसइतकाच संसर्गजन्य होतोय? तज्ज्ञ सांगतात की...

सध्याच्या दिवसात टीबी हा कोरोना व्हायरसइतकाच संसर्गजन्य होतोय? तज्ज्ञ सांगतात की...

googlenewsNext

डॉ. भरत गोपाल, डायरेक्टर, नॅशनल चेस्ट सेंटर

कोव्हिड-१९चा टीबीच्या साथीवरील परिणाम: समाजाचा दृष्टिकोन या ग्लोबल कोएलिशन ऑफ टीबी अॅक्टिव्हिस्ट्स (GCTA) यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार भारतात कोरोनाव्हायरसची लागण होण्याच्या भीतीने दर दोनपैकी एका रुग्णाने टीबीवरील उपचार घेण्यास टाळाटाळ केली. ही भीती आणि राष्ट्रीय पातळीवरील लॉकडाऊनमुळे (मार्च ते मे) यामुळे टीबीच्या रुग्णांकडून फॉलो-अपचे आणि टीबीच्या चाचण्या करून घेण्याचे (एक्स-रे, कल्चर आणि यकृताचे कार्य) प्रमाण कमी झाले. त्याचप्रमाणे इतर अनेक अभ्यासांमधून दिसून आले की, टीबीच्या रुग्णांना कोरोनाव्हायरसची लागण होण्याचे प्रमाणे ०.३७% ते ४.४७% आहे. ही परिस्थिती पाहता तज्ज्ञांनी टीबीशी संबंधित सेवा आणि सुधारीत चाचणी धोरणे  व  प्रक्रिया अधिक तीव्र करण्याचे ठरवले, जेणेकरून या तितक्याच तीव्रतेच्या संसर्गजन्य आजाराशी लढणाऱ्या लाखो व्यक्तींचा जीव वाचवता येईल. 

टीबीला ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते आणि जगभरात दरवर्षी १ कोटी व्यक्तींना या आजाराची लागण होते. त्यापैकी १५ लाख व्यक्तींचा दर वर्षी मृत्यू होतो. टीबीच्या जगभरातील एकूण रूग्णांपैकी 27% रुग्ण भारतात आहे आणि दर दिवशी १४०० टीबी रुग्णांचा मृत्यू होतो. सरकारने टीबी  हा ‘नोटिफाएबल डिसीज’ (असा आजार जो झालेल्या व्यक्तीची सरकारदप्तरी नोंदणी करावी लागते) केला असला तरी महामारी सुरू झाल्यामुळे आरोग्यसेवा कार्यकर्त्यांसमोर अनपेक्षित आव्हाने उभी राहिली. कारण टीबीचे निदान आणि नोटिफिकेशन्समध्ये घट झाल्याचे भारत सरकारला आढळून आले. ताज्या जागतिक टीबी अहवालानुसार, जानेवारी-जून याकाळात भारतातील टीबी नोटिफिकेशनमध्ये २०१९ सालातील याचा कालावधीच्या तुलनेने २६% घट झाली. 

CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या दीर्घकाळ संसर्गानंतर 'या' आजारांचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा 

जागतिक आरोग्य संघटनेनुसार टीबी आणि कोरोनाव्हायरसची लक्षणे सारखीच आहेत - खोकला, धाप लागणे, ताप आणि अशक्तपणा. पण टीबीमध्ये ही लक्षणे हळुहळू दिसू लागतात, साधारण काही आठवड्यांमध्ये किंवा त्याही पेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. या उलट कोरोनाव्हायरसची लक्षणे काही दिवसांत दिसतात. टीबीच्या रुग्णाला सुमारे ९ महिने औषधे घ्यावी लागू शकतात, पण सुरुवातीचे दोन-तीन आठवडे औषधे घेतल्यानंतर, या आजाराची लागण झालेली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीमध्ये संसर्ग पसरवत नाही. कोरोनाव्हायसच्या बाबतीत, ज्यांच्यात SARS-CoV-2 लक्षणे विकसित झाली आहेत, पण जे असिम्प्टोमॅटिक आहे, त्या व्यक्तींमुळेही या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

टीबी आणि कोरोनाव्हायरसमुळे एक प्रकारचा सामाजिक कलंक लावण्यात येतो आणि भीती जोडण्यात आली आहे याकडेही जागतिक आरोग्य संघटना अंगुलीनिर्देश करते. त्यामुळे आधीच त्रास होत असलेल्या रुग्णासाठी ते हानिकारक ठरते. जेव्हा समाजाकडून या आजाराशी संबंधित, भेदभावाच्या वागणुकीचा सामना करावा लागतो तेव्हा रुग्णाचा प्रवास हा अधिक क्लेशदायक होतो. त्यामुळे आपल्याला एक समाज म्हणून टीबीविषयी जागरुक होणे गरजेचे आहे आणि या आजाराबद्दल पडताळणी न केलेली आणि अर्धवट माहिती पसरवू नये. या कठीण परिस्थितीत आपल्यासमोर अत्यंत सूक्ष्म शत्रूचे आव्हान आहे, त्यामुळे जे या आजाराचा सामना करत आहे त्यांच्याबद्दल कोणताही पूर्वग्रह मनात न बाळगणे गरजेचे आहे. टीबी आजाराचा सामना करणाऱ्यांप्रती प्रत्येकाची सहानुभूतीपूर्व आणि अनुकंपापूर्वक वागणूक असावी. या आजाराविषयी मजून घ्या आणि कोणत्याही अनुचित मानसिक वागणुकीला चालना देऊ नये.

 तुम्हीसुद्धा सकाळी उशीरा नाष्ता करताय? मग 'हा' आजार कधी होईल कळणारही नाही, वेळीच तब्येत सांभाळा

तुम्ही किंवा तुमच्या जवळच्या व्यक्ती टीबीचा सामना करत असतील तर तुम्ही/ते काळजी घेत असतील याची खातरजमा करा आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार उपचार सुरू ठेवा. त्याचप्रमाणे या आजाराच्या संशयित रुग्णांना चाचणी करून घेण्यासाठी आणि उपचार सुरू करण्यास मन वळवा जेणेकरून या आजाराचा फैलाव होणार नाही तुमच्याकडून, टीबी कार्यक्रम कर्मचाऱ्यांकडून, काळजीवाहक, वैद्यकीय तज्ज्ञ, कुटुंबीय आणि मित्रांकडून भावनात्मक आणि सहाय्यकारक वर्तनामुळे टीबीचे रुग्ण पूर्वग्रहयुक्त वागणुकीपासून लांब राहतात आणि लवकर बरे होतात.

Web Title: Is TB as contagious as the corona virus? Know Experts openion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.