तुम्हाला आर्थ्राइटिस म्हणजे संधिवाताचा त्रास असेल, तर हिवाळा ऋतू तुमच्यासाठी वेदनादायक ठरू शकतो. त्याचे कारण म्हणजे गार वातावरणामुळे हात थंडगार पडणे किंवा पाय दुखणं उद्भवतं. वातावरणातल्या गारठ्यामुळे तुमच्या हाता-पायातील रक्तप्रवाह केंद्राशी एकवटून राहतो व त्यामुळे हाता-पायात पुरेशी उष्णता राहत नाही. संधिवाताने प्रभावित असलेले सांधे थंडीत आखडतात कारण, सांध्यांमधील प्रवाही हव्या तितक्या सहजपणे फिरू शकत नाही. आर्थ्राइटिस या आजाराबद्दल नानावटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टर प्रदिप भोसले यांनी माहिती दिली आहे. डॉक्टर प्रदिप भोसले हे आर्थ्रायटिस आणि जॉइंट रिप्लेसमेन्ट सर्जरी या विषयातील वैद्यकिय तज्ञ आहेत.

Image result for arthritis

मनुष्याचे हात आणि मनगट यांमध्ये एकंदर 25 सांधे असतात, व त्यामुळे संधिवाताने ते प्रभावित होण्याची शक्यताही तितकीच जास्त असते. त्यामुळे, संधिवाताच्या रुग्णांनी अधिक दक्ष राहून विशेष काळजी घेतली पाहिजे.

Image result for arthritis

गार हवा आणि हात गारठण्याचे वेगवेगळे भयानक दुष्परिणाम असतात, जसे की, हाताचे कौशल्य, पकड, जोर आणि संवेदनशीलता कमी होणे. गार हवेच्या सतत संपर्कामुळे फ्रॉस्टबाइट आणि नेक्रॉसिस (गारठल्यामुळे ऊतींना होणारी दुखापत) देखील होऊ शकते. 30 ते 49 वयोगटातील लोकांमध्ये हे सर्वाधिक होत असल्याचे आढळते. हातापायाच्या बोटांना मुंग्या येणे हा धोक्याचा इशारा असतो, जो सुचवतो की, तुमच्या शरीराला ऊबेची गरज आहे.सतत जाणवणारी अस्वस्थता आणि वेदना असल्यास एक्स-रे सहित नियमित तपासण्या करणे तसेच तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ( हे पण वाचा-व्यायाम आणि डाएटिंग करून सुद्धा वजन कमी होत नाही? तर हे असू शकतं कारण, वेळीच व्हा सावध!)

Image result for arthritis
हात आणि पायाच्या वेदनेसाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि घ्यायची काळजी:

सर्वात महत्त्वाचे म्हणजे थंडीच्या ऋतुत आपले हात आणि पाय ऊबदार ठेवा आणि सांधे आखडू नयेत यासाठी करण्याचा सोपा उपाय म्हणजे हातमोजे व पायमोजे घाला. 

Image result for arthritis

हातापायाची  हालचाल करत राहा. हालचालीमुळे हाता-पायात रक्तप्रवाह व्यवस्थित राहील. शारीरिक हालचालींमुळे तुमचे शरीर ऊबदार आणि तरतरीत राहील. तुम्हाला जेव्हा वेदना किंवा अस्वस्थता जाणवेल, तेव्हा एखादा बॉल घट्ट दाबणे, हात व पाय एकमेकांवर चोळणे यांसारख्या साध्या व्यायामामुळे रक्ताभिसरण पूर्ववत होण्यास मदत होईल.

Image result for arthritis

हात आणि पाय गरम पाण्यात बुडवून ठेवल्याने किंवा गरम पाण्याखाली हात व पाय धरल्याने ते शिथिल होतील व तुम्हाला बरे वाटेल. गरम पाण्याने केलेलं स्नान खूप लाभदायक ठरू शकते, विशेषतः वयोवृद्धांचे रक्ताभिसरण चांगले राहण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. ( हे पण वाचा-वजन कमी करण्यासाठी 'या' तीन डाळी ठरतात परफेक्ट उपाय, इतर फायदे वाचून व्हाल अवाक्)

Image result for arthritis

मॉईश्चराईझिंग लोशन किंवा तेल त्वचेसाठी मदतरूप होऊ शकते, ते थंडीत पायाच्या भेगांना प्रतिबंध करण्यासाठी देखील मदतरूप असते व सांध्यांमधील वेदना कमी करण्यास देखील मदत करते. अशी विविध क्रीम्स मिळतात, जी दाह कमी करणारी असतात व ती सांध्यांच्या वेदनेवर देखील प्रभावी असतात. परंतु, त्यातील एखादे निवडण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Image result for arthritis

हातातील वेदनेपासून आराम देण्यासाठी तुमचा आहार आणि अन्न देखील महत्त्वाची भूमिका बजावते. आहारात दाह-विरोधी पदार्थ सामील केल्यास मदत होऊ शकेल. त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, नट्स, बेरीज् आणि मासे यांचा समावेश असू शकतो. या सर्वांमुळे दाह कमी आणि नियंत्रित होतो, असे आढळून आले आहे.

Web Title: Symptoms and causes of arthritis for winter care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.