शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लू रुग्णांचा जीव धोक्यात!

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

स्वाईन फ्लू रुग्णांचा जीव धोक्यात!

स्वाईन फ्लू रुग्णांचा जीव धोक्यात!
- ३६ नमुने प्रलंबित : तीन दिवसानंतर मिळत आहे नमुन्याचा अहवाल
(स्वाईन फ्लूचा लोगो वापरावा)
-लोकमत स्पेशल
सुमेध वाघमारे
नागपूर : राज्यात नागपुरात सर्वात जास्त स्वाईन फ्लूचे रु ग्ण आढळत आहेत. स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उपराजधानी हादरली आहे. अपुऱ्या सोयींमुळे स्वाईन फ्लूचा धोकाही वाढत चालला आहे. परंतु प्रशासन अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र आहे. दिवसभरात संशयित स्वाईन फ्लूचे १५च्यावर नमुने गोळा होत असताना शासकीय प्रयोगशाळेत फक्त १३च नमुने तपासले जात आहे. यातच खासगीमध्ये नमुने तपासणीचे शुल्क सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. सध्याच्या घडीला ३६वर नमुने प्रलंबित आहेत. परिणामी, नमुन्यांचा अहवाल मिळण्यास उशीर होत असल्याने उपचाराची दिशा ठरविण्यास डॉक्टरांना कठीण झाले असून रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
उपराजधानीत २००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. पूर्वी या आजाराच्या संशयित रुग्णाचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी जात होते. परंतु दोन ते पाच दिवसानंतर स्वाईन फ्लूबाधितांचा अहवाल प्राप्त होत होता. यावर उपाय म्हणून २०१२ मध्ये नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) प्रयोगशाळेत स्वाईन फ्लूचे नमुने तपासण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. परंतु गेल्या दोन वर्षांत या आजाराच्या रुग्णांची संख्या रोडावल्याने कमी नमुने तपासणीच्या या समस्येकडे कुणाचेच लक्ष गेले नाही.
- मेयोच्या प्रयोगशाळेत रोज येतात १५ ते २० नमुने
मेयोच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत रोज तपासणीसाठी संशयित स्वाईन फ्लू रुग्णाचे १५ ते २० नमुने येतात. परंतु येथील पॉलिमर चेन रिॲक्शन (पीसीआर) मशीनची मर्यादा व नमुने तपासणीसाठी लागणारा सहा तासांचा वेळ यामुळे १३वर नमुने तपासले जात नाही. यासंदर्भात अधिक माहिती देताना मेयोच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. एस.एन. श्रीखंडे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी १३वर नमुने तपासणीचा प्रयत्न केला, परंतु मशीन गरम झाल्याने हा प्रयत्न थांबविला.