शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

तुमच्या चालण्याचा वेग सांगतो, तुम्ही किती लवकर म्हातारे होत आहात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 10:03 IST

प्रत्येक व्यक्तीचा चालण्याचा वेग आणि पद्धत वेगवेगळी असते. काही लोक वेगाने चालतात, काही लोक फार हळू रमत-गमत चालतात तर काही लोकांचा चालण्याचा वेग हा मध्यम असतो.

(Image Credit : verywellfit.com)

प्रत्येक व्यक्तीचा चालण्याचा वेग आणि पद्धत वेगवेगळी असते. काही लोक वेगाने चालतात, काही लोक फार हळू रमत-गमत चालतात तर काही लोकांचा चालण्याचा वेग हा मध्यम असतो. वेगाने चालण्याचे फायदे अनेक आहेत, त्यातील एक महत्वाचा म्हणजे वजन कमी करण्यास मदत होते. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, चालण्याच्या वेगावरून हे माहीत पडतं व्यक्ती किती लवकर वृद्ध होणार आहे.

(Image Credit : odishatv.in)

'जामा नेटवर्क ओपन' मध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, ४५ वर्षांचे असे व्यक्ती जे नैसर्गिक रूपाने हळू चालतात, त्यांच्या मेंदूत आणि शरीरात लवकर वृद्ध होण्याची लक्षणे बघायला मिळतात. या लक्षणांना १९ पातळ्यांवर मोजण्यात आले होते. ज्यांच्या माध्यमातून व्यक्ती वृद्ध झाल्यावर त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं असेल याची टेस्ट केली गेली.

(Image Credit : deccanchronicle.com)

रिसर्चमधून समोर आलं आहे की, अशा व्यक्तींना अल्झायमरसारखा विसरण्याचा आजार होण्याचाही धोका जास्त राहतो. सोबतच जे लोक हळू चालतात त्यांच्या लंग्स, दात आणि इम्यून सिस्टीममध्ये वेगाने किंवा मध्यम वेगाने चालणाऱ्यांच्या तुलनेत अधिक समस्या बघायला मिळतात.  

इतकेच नाही तर हळू चालणाऱ्यांच्या चेहऱ्यावर वय वाढल्याची किंवा वृद्ध होण्याची लक्षणे दिसू लागतात. आठ लोकांच्या पॅनल द्वारे वेगवेगळ्या लोकांच्या फोटोंवर त्यांची प्रतिक्रिया नोट केल्यावर हा निष्कर्ष काढण्यात आला.

(Image Credit : sites.stedwards.edu)

यूएसच्या ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, रिसर्चमधून हैराण करणारे निष्कर्ष समोर आले आहेत. अभ्यासकांनी सांगितले की, लहान मूल जेव्हा तीन वर्षांचं होतं तेव्हा त्यांच्या मेंदूच्या विकासाच्या आधारावर वैज्ञानिक याची माहिती घेऊ शकतात की, ते मध्यम वयात पोहोचल्यावर किती वेगाने चालणार आहेत. सोबतच त्यांचा आयक्यू स्कोर, भाषा समजण्याची क्षमता, मोटर स्किल्स आणि इमोशनल कंट्रोलच्या माध्यमातून याची माहिती मिळवता येऊ शकते. हळू आणि वेगाने चालणाऱ्या लहान मुलांच्या आयक्यूमध्ये १२ अंकांचा फरक बघण्यात आला. 

(Image Credit : medicalnewstoday.com)

वैज्ञानिकांचं असं मत आहे की, व्यक्ती कशी चालते हे त्यांच्या अंगांवर आणि ते किती निरोगी आहेत यावर अवलंबून असतं. गोष्टी समजून घेणे आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याची क्षमता सुद्धा चालण्याच्या वेगाशी जोडली जाऊ शकते. हेच कारण आहे की, कमी वेग हे दाखवतो की, व्यक्तीच्या ऑर्गनचं कार्य खराब होत आहे. याने ते वेळेआधीच म्हातारे होण्यासोबतच वेगवेगळ्या आजारांचे शिकार देखील होत आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यResearchसंशोधन