Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:40 IST2026-01-15T16:39:13+5:302026-01-15T16:40:46+5:30
What Is Retail Therapy: एका ताज्या संशोधनानुसार, नियमितपणे शॉपिंग करणे हे केवळ पैशांचा खर्च नसून ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी एक उत्तम औषध ठरू शकते, यालाच रिटेल थेरपी असे म्हणतात.

Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
नियमितपणे शॉपिंग करणाऱ्या व्यक्तींसाठी आनंदाची बातमी आहे. अलीकडेच झालेल्या एका संशोधनातून नियमितपणे खरेदी करणाऱ्या व्यक्ती इतर लोकांच्या तुलनेत अधिक आनंदी आणि आणि त्यांच्यात तणावाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे या व्यक्ती दिर्घायुष्य जगतात. या प्रक्रियेला आता मानसशास्त्रात 'रिटेल थेरपी' म्हणून ओळखले जात आहे.
रिटेल थेरपी म्हणजे केवळ पैसे खर्च करणे नव्हे, तर शॉपिंगच्या माध्यमातून स्वतःला मानसिक आनंद देणे आहे. संशोधनानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आवडीची वस्तू खरेदी करते, तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे फील-गुड हार्मोन रिलीज होते आणि त्यांचा मूड बदलतो.
शॉपिंग आरोग्यासाठी फायदेशीर
शॉपिंगमुळे कामाचा व्याप आणि चिंतातून मुक्तता होते. अभ्यासात असे दिसून आले आहे की, स्वतःसाठी शॉपिंग करताना महिलांना आपल्या जीवनावर आपले नियंत्रण असल्याची भावना निर्माण होते, ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो. शॉपिंग नकारात्मक विचार कमी करण्यास मदत करते. शॉपिंग करणे हे केवळ एक काम नसून ती एक प्रकारची मानसिक विश्रांती ठरते.
महिलांसाठी वरदान ठरतेय शॉपिंग
महिलांवर केलेल्या या संशोधनातून असे समोर आले आहे की, ज्या महिला आठवड्यातून किमान एकदा स्वतःसाठी काहीतरी खरेदी करतात, त्या इतर महिलांच्या तुलनेत अधिक सक्रिय आणि आनंदी असतात. महिलांच्या खरेदीच्या आवडीची अनेकदा थट्टा केली जाते, मात्र हीच सवय त्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
तज्ज्ञांकडून महत्त्वाचा सल्ला
रिटेल थेरपी फायदेशीर असली तरी, तज्ज्ञांनी आपल्या बजेटनुसार खरेदी करण्यावर भर दिला आहे. बजेटमध्ये खरेदी केल्यास अनावश्यक खर्च वाटत नाही. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. कधी तणाव किंवा आत्मविश्वासाची कमतरता जाणवत असेल, तर स्वतःला एक छोटीशी भेट द्यायला हरकत नाही, असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला.