पेनकिलरच्या सेवनाने होऊ शकतात 'या' गंभीर समस्या, वाचा कोणत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 14:42 IST2020-02-10T14:39:26+5:302020-02-10T14:42:19+5:30
रोजच्या कामात बिझी असताना आपल्याला आरोग्याच्या अनेक लहान मोठ्या कुरबूरी उद्भवत असतात.

पेनकिलरच्या सेवनाने होऊ शकतात 'या' गंभीर समस्या, वाचा कोणत्या
रोजच्या कामात बिझी असताना आपल्याला आरोग्याच्या अनेक लहान मोठ्या कुरबूरी उद्भवत असतात. ऑफिसमध्ये सतत बसून पाठ दुखणे, मान दुखणे, जास्त प्रेशर देणारं काम असेल तर डोकं जड होतं. कोणतीही समस्या उद्भवली तर आपण पेनकिलर खात असतो. आपण लहान मोठ्या समस्यांसाठी दवाखान्यात जात नाही. मेडिकलवाल्या विक्रेत्याला विचारून आपण गोळ्यांचे सेवन करत असतो.
ताप, सर्दी, अंगदुखी, यांसारख्या समस्यांसाठी बाजारात मोठ्या संख्येने कंपन्या टॅब्लेट्स पुरवत असतात. पण तुम्हाला माहित आहे का सतत पेनकिलरचं सेवन करणं तुमच्या शरीराला महागात पडू शकतं. डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणत्याही प्रकराच्या गोळ्या घेतल्यानंतर जीवघेणे आजार होण्याचा धोका असू शकतो.
पॅरासिटामॉलमुळे अल्सर
पॅरासिटामॉलमुळे या औषधाचा वापर सामान्यपणे अंगात ताप असताना केला जातो. जर डॉक्टरांना न विचारता तुम्ही या गोळ्यांचे सेवन केले तर पोटात अल्सर आणि एसिटिडी होण्याचा धोका असतो. या परिस्थितीत रक्ताच्या उलट्या सुद्धा होऊ शकतात. जर तुम्हाला जास्त ताप असेल तर डॉक्टरांना विचारून मगचं गोळ्यांचे सेवन करा. तसंच जर ताप १०० डीग्री फॅर्नहाईटपेक्षा जास्त ताप असेल तेव्हाच पॅरासिटामॉल खा.
आइब्रूप्रोफेनमुळे हाय बीपीची समस्या
आइब्रूप्रोफेन आणि पॅरासिटामॉल यांना एकत्र करून सगळ्यात जास्त कॉमन असणारी पेनकिलर तयार केली जाते. ती म्हणजे कॉम्बिफ्लेम ही सगळ्यात जास्त खाल्ली जाणारी पेनकिलर आहे. या गोळीचे जास्त सेवन केल्यामुळे फुप्पुसांचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यामुळे दम्याचा त्रास होऊ शकतो. तसंच थायरॉईड सुद्धा होऊ शकतो.
कफसिरपमुळे विजन लॉसचा धोका
कफसिरपमध्ये ऐंटिहिसटैमिन्स असतता. जे शिंका येणे, खोकला येणे, नाक गळण्याच्या समस्या दूर करतात. त्यामुळे झोप यायला सुरूवात होते. तसचं नजर सुद्धा कमजोर होण्याचा धोका असतो. त्यापेक्षा जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर घरगुती उपायांचा वापर करून आरोग्याला चांगलं ठेवू शकता. वाफ घेऊन, काढा पिऊन, गरम सूप पिऊन तुम्ही सर्दीपासून आराम मिळवू शकता. ( हे पण वाचा-३ दिवसात लिव्हर डीटॉक्स करेल मनुक्याचं हे खास पाणी, फायदे वाचून व्हाल अवाक्...)
गॅस किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास
रोज पेनकिलर्स जास्तीत जास्त लोकं पटकन बरं होण्यासाठी खातात. त्यामुळे तुम्हाला एसिडिटीची आणि पोट साफ न होण्याची समस्या उद्भवू शकते. पेनकिलर्सचा जास्त वापर केल्यामुळे तोंड सुकण्याचा त्रास होतो. तुम्हाला सुद्धा जास्त तोंड सुकल्यासारखं वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. ( हे पण वाचा-किडनीमध्ये ट्यूमरचे किती प्रकार असतात आणि त्याने काय होतात समस्या?)