किडनीमध्ये ट्यूमरचे किती प्रकार असतात आणि त्याने काय होतात समस्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 11:27 AM2020-02-10T11:27:23+5:302020-02-10T11:32:12+5:30

काही ट्यूमर हळू वाढतात तर काही ट्यूमर वेगाने वाढतात. हेच कॅन्सरचं कारण ठरतं किडनीमध्ये ट्यूमर का होतो याचं ठोस कारण माहीत नाही.

Do you know about types of kidney tumor | किडनीमध्ये ट्यूमरचे किती प्रकार असतात आणि त्याने काय होतात समस्या?

किडनीमध्ये ट्यूमरचे किती प्रकार असतात आणि त्याने काय होतात समस्या?

googlenewsNext

अनेक केसेसमध्ये किडनीला ट्यूमर झाल्याचं बघायला मिळतं. काही ट्यूमर हळू वाढतात तर काही ट्यूमर वेगाने वाढतात. हेच कॅन्सरचं कारण ठरतं किडनीमध्ये ट्यूमर का होतो याचं ठोस कारण माहीत नाही. किडनी ट्यूमर डायग्नोस केल्यावर समोर आलं की, काही ट्यूमर आपल्या जागेवरच राहतात, ते दुसरीकडे पसरत नाही. असे सांगितले जाते की, साधारण ४० टक्के किडनीचे ट्यूमर लोकलाइज्ड रीनल मासेसमुळे होतात.

किडनीबाबत तुम्हाला हे माहीत आहे का?

मूत्रपिंडे म्हणजेच किडनी अशुद्ध रक्‍त शुद्ध करण्याचे काम करत असतात. मूत्रपिंडात आलेल्या रक्तातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते मूत्र मार्गातून विसर्जित होतात. या शिवाय त्यात ‘डी-३‘ हे जीवनसत्त्व आणि एरिथ्रोपोइटिन-दोन नावाचे संप्रेरक तयार होते. ड जीवनसत्त्व मानवी शरीरातल्या कॅल्शियमचे संतुलन ठेवण्यासाठी लागते. एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या लाल पेशी तयार होतात.

- शरीरातील तरल पदार्थ बॅलन्स करण्याचं काम करते.

- इलेक्ट्रोलाइट्स लेव्हल म्हणजे सोडिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, अॅसिड इत्यादी मेंटेन करण्यात किडनी मदत करतात.

- वेस्ट रक्तातून वेगळं करून लघवी निर्माण करतात.

- तसेच किडनी हार्मोन्स तयार करण्याचं कामही करतात.

- शरीराचं ब्लड प्रेशर स्टेबल ठेवण्याचं काम करतात.

- शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्याचं काम करतात.

किडनी ट्यूमरचे प्रकार

रीनल सेल कार्सिनोमास

रीनल सेल कार्सिनोमास किंवा RCC ला सर्वात कॉमन किडनी ट्यूमर मानलं जातं. यात किडनीच्या लहान ट्यूबच्या लायनिंगमध्ये ट्यूमर आढळतात. तसेच यात किडनीमध्ये सिंगल ट्यूमरही होऊ शकतो. 

बेनाइंग रेनल ट्यूमर

याप्रकारातील ट्यूमर किडनीमध्ये नऊ वेगवेगळ्या प्रकारात आढळतो. यात ट्यूमरचा आकार थोडा मोठा असू शकतो. पण हे गरजेचं नाही की, सगळेच ट्यूमर कॅन्सरचं कारण ठरावेत. काही ट्यूमर कन्सरचं कारण ठरू शकतात आणि शरीरातील दुसऱ्या अवयवांमध्येही कॅन्सरचे सेल्स पसरवू शकतात.

विल्म्स ट्यूमर

विल्म्स ट्यूमर जास्तकरून लहान मुलांमध्ये आढळतो. 

रीनल सेल कार्सिनोमस

RCC म्हणजेच रीनल सेल कार्सिनोमस किडनीमधील ट्यूमरचा एक प्रकार आहे. RCC मुळेच जास्तीत जास्त ट्यूमर कॅन्सरचं रूप घेतात. साधारण ९० टक्के कॅन्सर लोकांना RCC मुळेच होतो. जेव्हा ट्यूमरची तपासणी मायक्रोस्कोपने केली जाते तेव्हा कन्सर सेल्सचं रूप वेगळं असू शकतं. त्यामुळे RCC ला काही भागांमध्ये विभागण्यात आलं आहे. याचे सबटाइप्सही असतात.

RCC ची समस्या का होते?

मेडिकल एक्सपर्टना आरसीसीचं ठोस कारण माहीत नाही. ही समस्या ५० आणि ७० वयोगटातील पुरूषांमध्ये अधिक आढळून येते. या समस्येची काही कारणे खालीलप्रमाणे असू शकतात.

 - आरसीसीची फॅमिली हिस्ट्री

- डायलिसिस ट्रिटमेंटमुळे

- हाय ब्लड प्रेशरमुळे

- लठ्ठपणामुळे

- धुम्रपान केल्याने

जर कुणालाही टेस्टमधून हे समजलं असेल की, किडनीमध्ये ट्यूमर आहे तर त्यांनी घाबरू नये. किडनीमध्ये ट्यूमर आहे याचा अर्थ हा नाही की, तुम्हाला कॅन्सर असेलच. डॉक्टरांनी केलेल्या टेस्टनंतरच हे कळू शकेल की, किडनीतील ट्यूमर कॅन्सर आहे की नाही. अशात काही लक्षणे दिसत असतील तर आधीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


Web Title: Do you know about types of kidney tumor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.