शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant : कोरोनाची लागण झालेल्या लोकांना ओमायक्रॉनपासून किती धोका? जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 20:48 IST

Omicron Variant : संशोधनात याबाबतचे पुरावे मिळाले आहेत आणि असे आढळले आहे की, ओमायक्रॉन हे बीटा किंवा डेल्टा प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे.

केप टाऊन : एकदा कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झालेल्या लोकांना पुन्हा ओमिक्रॉन (Omicron)व्हेरिएंटचा संसर्ग होऊ शकतो का? याबाबतचा नवीन खुलासा एका स्टडीतून समोर आला आहे सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ज्या लोकांना याआधी कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, त्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे, असे दक्षिण आफ्रिकेतील संशोधकाने सांगितले. तसेच, त्यांना संशोधनात याबाबतचे पुरावे मिळाले आहेत आणि असे आढळले आहे की, ओमायक्रॉन हे बीटा किंवा डेल्टा प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे.

कोविड प्रोटोकॉलचे पालन करारिपोर्टनुसार, ओमायक्रॉनच्या संसर्गावर फायनल स्टडी अद्याप झालेली नाही. मात्र, प्राथमिक परिणामांवरून असे दिसून येते की, ज्यांना आधीच कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, अशा लोकांवर याचा परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, ज्या लोकांना यापूर्वी कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. तसेच, त्यांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यास कोणतीही टाळाटाळ करू नये.

इतर व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य या कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने  'Variant of Concern' म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरिएंटच्या यादीत समावेश केला आहे. तसेच, हा व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे, असेही  जागतिक आरोग्य संघटने म्हटले आहे. याशिवाय, सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना लसीच्या डोसचाही ओमायक्रॉन व्हेरिएंटवर काही विशेष परिणाम होणार नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, अनेक तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, लस कोणत्याही व्हेरिएंटपासून नक्कीच काही प्रमाणात संरक्षण देईल.

आफ्रिकेत ओमायक्रॉनचे 35 हजारांहून अधिक रुग्णदरम्यान, दक्षिण आफ्रिकेत या व्हेरिएंटचा रुग्ण सर्वात आधी सापडला होता. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचे 35 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी बरेच लोक असे आहेत, ज्यांना आधीही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेशिवाय जगातील काही देशांमधून ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत आहेत. आतापर्यंत 30 हून अधिक देश ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या कचाट्यात आले आहेत. त्यामुळे जगातील अनेक देशांनी आफ्रिकी देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन