शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

औषधांच्या कठाेर गुणवत्ता तपासणीसाठी आता कायदा; विषारी सिरप प्रकरणानंतर केंद्र सरकारने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:18 IST

अनेक देशांच्या आरोग्य नियामक संस्था आणि जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतीय औषध उत्पादक कंपन्यांच्या गुणवत्ता नियंत्रणाबाबत वारंवार चिंता व्यक्त केल्याने हा नवा कायदा तयार केला जात आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या गुणवत्तेवर अधिक कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन कायदा आणणार आहे. या कायद्यानुसार बाजारपेठेतील देखरेख आणि गुणवत्ता चाचणी प्रणाली अधिक बळकट केली जाणार आहे.

अनेक देशांच्या आरोग्य नियामक संस्था आणि जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतीय औषध उत्पादक कंपन्यांच्या गुणवत्ता नियंत्रणाबाबत वारंवार चिंता व्यक्त केल्याने हा नवा कायदा तयार केला जात आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीत ‘ड्रग्ज, मेडिकल डिव्हाइसेस अँड कॉस्मेटिक्स कायदा २०२५’ याचा मसुदा सादर करण्यात आला. ही बैठक केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

कायद्याची रूपरेषा तयार बैठकीत ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) डॉ. राजीव रघुवंशी आणि सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रस्तावित कायद्याची रूपरेषा मांडली. ही बैठक मध्य प्रदेशात विषारी खोकल्याच्या सिरपमुळे अनेक बालकांच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच घेण्यात आली.

नव्या कायद्यात काय? नव्या कायद्यानुसार सीडीएससीओला प्रथमच कायद्यानुसार वैधानिक अधिकार दिले जाणार आहेत, ज्याद्वारे बनावट किंवा निकृष्ट औषधांवर त्वरित कारवाई करता येईल. तसेच, परवानाधारक प्रक्रिया डिजिटल करण्यात येणार असून राज्यस्तरीय औषध नियंत्रकांमधील समन्वय वाढविणे व तपासणी प्रयोगशाळांची क्षमता वाढवणे या तरतुदीही असतील.हा नवा कायदा १९४० च्या ‘ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट’च्या जागी लागू होईल. आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत अशा या कायद्याचा उद्देश निर्मितीपासून बाजारपेठेपर्यंत पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणे हा आहे. 

३.२ टक्के औषधे निकृष्टभारतात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांचे प्रमाण चिंताजनक आहे. सीडीएससीओच्या २०२३-२४ च्या अहवालानुसार, तपासण्यात आलेल्या सुमारे ५,५०० नमुन्यांपैकी ३.२ टक्के औषधे निकृष्ट किंवा बनावट निघाली. गेल्या दोन वर्षांत ४० हून अधिक औषध उत्पादक कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Stringent Drug Quality Law Soon After Syrup Deaths: Center's Decision

Web Summary : To tighten drug quality, India will introduce a new law, strengthening market monitoring and testing. Prompted by global concerns over Indian drug quality, the 'Drugs, Medical Devices and Cosmetics Act 2025' aims for transparency and accountability from production to market, replacing the 1940 act.
टॅग्स :medicineऔषधं