Novel inhalable llama antibodies may help treat prevent to corona virus study finds | दिलासादायक! लामा एंटीबॉडीजनी कायमचा नष्ट होणार कोरोना व्हायरस; शास्त्रज्ञांचा दावा

दिलासादायक! लामा एंटीबॉडीजनी कायमचा नष्ट होणार कोरोना व्हायरस; शास्त्रज्ञांचा दावा

कोरोना व्हायरससारख्या जीवघेण्या माहामारीपासून बचावासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ  दिवसरात्र लस आणि औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत कोणत्याही देशाच्या लसीचे समाधानकारक परिणाम दिसून आलेले नाहीत. दरम्यान एका अभ्यासात कोरोना व्हायरशी लढण्यासाठी इनहेल्ड लामा एंटीबॉडी  परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले आहे. 

६ नोव्हेंबरला अमेरिकेतील वॉशिंग्टन मधील वैज्ञानिकांनी लामांपासून शक्तीशाली कोरोना व्हायरसच्या एंटीबॉडी तयार करण्याच्या नवीन तंत्राचा विकास केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचा प्रसार  रोखण्यासाठी तसंच उपचार करण्यासाठी इनहेलेबल थेरेप्यूटिक्सचा वापर केला जाऊ शकतो.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ  पिट्सबर्ग (स्कूल ऑफ मेडिसिन) च्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष लामा एंटीबॉडींजना नॅनो बॉडी असं म्हटलं जातं.  या एंटीबॉडी खूप लहान असतात. याद्वारे कोरोना व्हायरस निष्क्रीय होण्यास मदत होऊ शकते.  गुरूवारी सायंस जर्नलमध्ये  हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं होतं.

खत्म हो जाएगा कोरोना

लेखिका यी शी यांनी सांगितले की, निसर्ग हा सगळ्यात मोठा अविष्कार आहे. आम्ही  ज्या तंत्राचे निरिक्षण केले त्यात एसएआरएस-सीओवी -2 ने मोठ्या प्रमाणावर नॅनोबॉडी निष्क्रीय केल्या. ज्याद्वारे हजारो नॅनोबॉडींचा शोध लावण्यास मदत मिळाली. संशोधकांनी वॅली नावाच्या काळ्या लामाला SARS-CoV-2 स्पाइक प्रोटीनच्या एका तुकडयासोबत संक्रमित केले. त्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी प्राण्याच्या प्रतिरक्षा प्रणालीने व्हायरस विरुद्ध परिपक्व नॅनोबॉडीचे उत्पादन केले होते.

कोरोना संसर्गानंतर सर्वाधिक लोकांना उद्भवतोय 'हा' आजार; आरोग्यमंत्रालयाने दिल्या गाईडलाईन्स

शी यांच्या प्रयोगशाळेतील  सहाय्याक संशोधक युफेई जियांग यांनी मास स्पेक्ट्रोमेट्री या तंत्राचा वापर करत वॅलीमधील रक्तात नॅनोबॉडीची ओळख पटवली होती.  त्यानंतर वैज्ञानिकांनी  नॅनोबॉडीज सार्स-सीओव्ही -2 विषाणूपासून वाचण्यासाठी सक्रिय केले. त्यानंतर असे आढळले की नॅनोग्रामचा एक अंश दहा लाख पेशींना संक्रमित होण्यापासून वाचवण्यासाठी पुरेसा आहे आणि त्यामुळे व्हायरस निष्क्रिय होऊ शकतो. 

खोकण्यातून किती वेळात आणि कसा होतो कोरोनाचा प्रसार?; संशोधनातून खुलासा

त्यांनी सांगितले की, एंटीबॉडी रुम टेंपरेचरवर सहा आढवड्यांपर्यंत एक्टिव्ह राहू शकते. आवश्यकता असल्यास एंटी व्हायरल थेरेपी फुफ्फुसांमध्ये पोहोचण्यासाठी इनहेबल मिस्ट या प्रकाराचा वापर केला जाऊ शकतो. कोविड १९ हा श्वासांशी संबंधीत आजार आहे. नॅनोएंटीबॉडी श्वसन प्रणालीत या आजाराचा शोध घेऊन शरीराचं नुकसान होण्यापासून वाचवू शकते. शी यांनी सांगितले की, ''नॅनोबॉडी कमीतकमी खर्चात उपलब्ध होऊ शकतात. वर्तमानकाळातील कोरोनाची संकट पाहता या तंत्राचे सकारात्मक परिणाम  दिसून येत आहेत.''

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Novel inhalable llama antibodies may help treat prevent to corona virus study finds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.