कोरोना संसर्गानंतर सर्वाधिक लोकांना उद्भवतोय 'हा' आजार; आरोग्यमंत्रालयाने दिल्या गाईडलाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 12:15 PM2020-11-06T12:15:42+5:302020-11-06T12:17:20+5:30

CoronaVirus News & latest Updates : कोरोनाने पीडित असलेल्या ३० टक्के रुग्णांमध्ये डिप्रेशन तर  ९५ टक्के लोकांमध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) ची समस्या उद्भवली आहे. 

Health ministry guidelines for people suffering for depression by covid-19 based on research | कोरोना संसर्गानंतर सर्वाधिक लोकांना उद्भवतोय 'हा' आजार; आरोग्यमंत्रालयाने दिल्या गाईडलाईन्स

कोरोना संसर्गानंतर सर्वाधिक लोकांना उद्भवतोय 'हा' आजार; आरोग्यमंत्रालयाने दिल्या गाईडलाईन्स

Next

भारतातील आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या माहामारीत जवळपास ३० टक्के लोकांना डिप्रेशनचा सामना करावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या माहामारीमुळे वाढता ताण तणाव पाहता काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. कोरोनामुळे जगभरातील लोकांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला आहे. यामुळेच आरोग्य सेवांवर दबाव पडत आहे. याशिवाय मानसिक आरोग्य व्यवस्थासमोर नवीन आव्हान उभं आहे. 

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार आरोग्य मंत्रालय आणि न्यूरोसायन्सच्या मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूटच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोविड साथीच्या रोगाने मानसिकदृष्ट्या प्रभावित झालेल्या तीन गटांचा उल्लेख केला आहे. पहिला गट म्हणजे कोरोना -१९ ने  ग्रस्त. त्यानुसार कोविड -१९ चा संसर्ग झालेल्या रुग्णांना मानसिक त्रास होऊ शकतो. कोरोनाने पीडित असलेल्या ३० टक्के रुग्णांमध्ये डिप्रेशन तर  ९५ टक्के लोकांमध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) ची समस्या उद्भवली आहे. 

प्रतीकात्मक तस्वीर

दुसर्‍या गटामध्ये अशा रुग्णांचा समावेश आहे ज्यांना आधीच मानसिक आजार होते. कोविडमुळे ते त्यांना पुन्हा या समस्या उद्भवू शकतात. इतकंच नव्हे तर या गटाच्या रूग्णांची  प्रकृती बिघडण्याबरोबरच नवीन मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तिसरा गट सामान्य लोकांचा आहे. सामान्य लोकांना तणाव, चिंता, झोपेची कमतरता, भ्रम किंवा सत्याचा काही संबंध नसलेला विचित्र विचार यासारख्या मानसिक समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. या गटाचे लोकही आत्महत्येचा विचार करत आहेत.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, दिल्ली (एम्स) चे मानसशास्त्रज्ञ श्रीनिवास राजकुमार यांचे म्हणणे आहे की सामान्य मानसिक आजारांपेक्षा ही आकडेवारी जास्त असल्याने हे संशोधन बरेच चिंताजनक आहे. परंतु संशोधनासाठी डेटा कुठून घेण्यात आला हे स्पष्ट नाही. एम्स कोविड ट्रॉमा सेंटर येथे  अशा रुग्णांसाठी व्यवस्था केली गेली आहे, जेथे मानसोपचारतज्ज्ञ रुग्णांशी सतत संवाद साधत असतात .

कोविड रूग्णांना आपल्या कुटूंबाकडे परत जाणं शक्य आहे की नाही याबद्दल असुरक्षिततेची भावना आहे. झोप न येण्याच्या   तक्रारीही सामान्य आहेत. बऱ्या झालेल्या रूग्णांना नैराश्य, चिंता आणि पॅनीक स्थितीमुळे ग्रस्त असल्याचेही दिसून आले आहे. '' दिल्ली येथील मानसशास्त्रज्ञ डॉ. पूजाशिवम जेटली म्हणतात की, ''कोविड दरम्यान लोकांचे मानसिक आरोग्य चिंताजनक आहे. एकटेपणा, चिंता, मनःस्थितीतील चढ-उतार आणि एकाग्रतेसंबंधी समस्यांचे जवळपास 50-60 टक्के  रुग्ण आहेत.

कोविडमुळे अनिश्चिततेचे वातावरण आहे. दररोज नवनवीन आकडेवारी येत आहेत, नवीन रुग्णसंख्या समोर येत आहेत आणि आतापर्यंत त्यावर ठोस उपाय नाही, त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. '' लोकांच्या दैनंदिन जीवनात बदल झाला आहे, याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. अनेकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत, अस्थिरतेचे वातावरण आहे, घरात  राहून काम केल्याने अनेक घरामध्ये वेगळं वातावरण तयार झालं आहे.

प्रतीकात्मक तस्वीर

कोरोना रूग्णांवर उपचार करत असलेल्या रुग्णालयांमध्ये सल्लामसलत करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे उपस्थित राहतील, असे नमूद करून सरकारने मानसिक स्थितीचा सामना करण्यासाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांद्वारे  रुग्णांचे फोनवरून अथवा भेटून काऊंसलिंग केले जाईल.  

 पॉझिटिव्ह बातमी! मेड इन इंडिया 'कोवॅक्सिन' येत्या फेब्रुवारीमध्ये लॉन्च होणार?, तज्ज्ञांचा खुलासा

डॉ. श्रीनिवास राजकुमार म्हणतात की, '' सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, परंतु जगभरात मानसोपचारतज्ज्ञांवर अवलंबून न राहता इतर डॉक्टरांनाही मानसिक आरोग्य सेवेच्या बाबतीत काम करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. आता भारतातही असे प्रक्षिक्षण डॉक्टरांना देण्याची गरज आहे.'' 

डोळ्यांच्या कॉर्नियावरही होऊ शकतो कोरोना व्हायरसचा परिणाम?; नव्या संशोधनातून खुलासा

डॉ. शिवम जेटली यांनी सांगितले की,'' कोविड दरम्यान लोकांना ज्या प्रकारे नैराश्य किंवा चिंता येत आहे, त्यामुळे भविष्यात भयानक परिस्थिती उद्भवू शकते. जर पावले उचलली गेली नाहीत तर अशी प्रकरणे वाढतील कारण लोकांना या समस्यांबाबत माहिती मिळत नाही तोपर्यंत या समस्यांवर मार्ग काढला जाऊ शकत नाही.

Web Title: Health ministry guidelines for people suffering for depression by covid-19 based on research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.