खोकण्यातून किती वेळात आणि कसा होतो कोरोनाचा प्रसार?; संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 09:28 AM2020-11-08T09:28:35+5:302020-11-08T09:36:20+5:30

CoronaVirus News & latest Updates : खोकल्याच्या एका उबळीतून तोंडावाटे हजारो शिंतोडे बाहेर पडत असतात आणि त्यांचा आकारही वेगवेगळा असतो.

Single cough droplet can travel close to 7 meters finds new research | खोकण्यातून किती वेळात आणि कसा होतो कोरोनाचा प्रसार?; संशोधनातून खुलासा

खोकण्यातून किती वेळात आणि कसा होतो कोरोनाचा प्रसार?; संशोधनातून खुलासा

Next

कोरोनाच्या माहामारीचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत कोरोनाचा प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरत असलेल्या सगळ्याच गोष्टींबाबत  संशोधनातून खुलासा होत आहे. दरम्यान कोरोना संसर्ग कसा आणि किती वेळात होतो. याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. यानुसार खोकल्याचा एक थेंब जवळपास 7 मीटरपर्यंत पसरू शकतो. हवेचा वेग जर सेकंदाला 2 मीटरपर्यंत गृहित धरला तर हा खोकल्याचा थेंब 6.6 मीटरपर्यंत प्रवास करतो. त्याचबरोबर कोरड्या हवेमध्ये देखील वाफेच्या माध्यमातून हा थेंब पसरू शकतात. या संशोधनात सिंगापूरमधील संशोधकांनी व्हायरल ट्रान्समिशन अधिक समजून घेण्यासाठी फ्लुइड फिजिक्सच्या महत्त्वपूर्ण घटकांचा अभ्यास केला.

इन्स्टिट्यूट ऑफ हाय परफॉर्मन्स कंप्युटिंगमधील संशोधकांनी केलेलं हे संशोधन 'Physics of Fluids या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. यामध्ये high fidelity air flow simulation चा वापर करत थेंबाचा प्रसार कशा पद्धतीने होतो याचा संख्यात्मक अभ्यास करण्यात आला . या संशोधनाचा भाग असलेले संशोधक फाँग येव लेआँग यांनी सांगितले  की, ''मास्क वापरण्यासोबतच सोशल डिस्टंन्सिंग प्रभावी ठरत आहे. कारण खोकणाऱ्या माणसापासून जर दुसरी व्यक्ती एक मीटर दूर असेल तर खोकल्यामुळे हवेत उडणारे शिंतोडे तुमच्यापर्यंत पोहोचून संसर्गाचा धोका कमी असतो. खोकल्याच्या एका उबळीतून तोंडावाटे हजारो शिंतोडे बाहेर पडत असतात आणि त्यांचा आकारही वेगवेगळा असतो. ''

कभी न दूर होने वाली खांसी

संशोधकांना दिसून आलं की खोकल्याचे मोठे थेंब गुरुत्वाकर्षणामुळे लगेच खाली बसतात . पण  काही थेंबांना गती असल्यामुळे वारं वाहत नसतानाही ते १ मीटरपर्यंत हवेत पसरू शकतात. मध्यम आकाराच्या थेंबांचं रुपांतर लहान थेंबांमध्ये होऊन हलके असल्यामुळे हवेतून लांबपर्यंत सहज जाऊ शकतात. संशोधकांनी थेंबाच्या प्रसाराचं अधिक स्पष्ट चित्र समोर मांडलं त्यांनी व्हायरच्या बायोलॉजिकल पद्धतीने विचार केला. खोकल्याच्या थेंबातील नॉनव्होलेटाइल भागाचं बाष्पीभवन आणि थेंबांच्या हवेतील प्रवासाविषयी अधिक सविस्तर माहिती दिली आहे.

एकदा दात पडल्यानंतर नवीन दात लावणं कितपत गरजेचं? जाणून घ्या डेंटिस्ट्सचा सल्ला

शास्त्रज्ञ  हाँगयिंग ली यांनी सांगितले की, ''बाष्पीभवनात होत असलेल्या थेंबात नॉनव्होलेटाइल व्हायरल कंटेंट तसाच राहतो त्यामुळे विषाणू पसरतो. याचा अर्थ असा की बाष्पीभवन न झालेल्या खोकल्याच्या मोठ्या थेंबापेक्षा बाष्पीभवन झालेल्या थेंबांपासून तयार झालेले एरोसोल्स श्वासावाटे फुफ्फुसांपर्यंत आणि श्वासनलिकेपर्यंत पोहोचून इन्फेक्शन होतं. मोठ्या प्रमाणात थेंब टिकून राहतात त्यामुळे हवेतील प्रसारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. मानवी शरीराभोवती असलेल्या हवेतील खोकल्याचे थेंब आणि हवेचा झोत यांची अशी गणिती सूत्र तयार करून त्याची कॉम्प्युटरच्या माध्यमातून उकल करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वाऱ्याचा वेगवेगळा वेग आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणामही गृहित धरण्यात आला होता.''

कोरोना संसर्गानंतर सर्वाधिक लोकांना उद्भवतोय 'हा' आजार; आरोग्यमंत्रालयाने दिल्या गाईडलाईन्स

या संशोधनात  ठराविक अंतरावर असलेल्या एखाद्या व्यक्तीवर या थेंबांचा काय परिणाम होतो याचाही अभ्यास करण्यात आला होता. तसंच आतापर्यंत करण्यात आलेल्या अभ्यासांमधील  गृहितकांच्या आधारावर हे संशोधन करण्यात आलं होतं.  यातून दिसून आलं की, थेंबाचा प्रवास हा हवेचा वेग, हवेतील आद्रता, हवेचे तापमान या घटकांवर अवलंबून असतो. 

Web Title: Single cough droplet can travel close to 7 meters finds new research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.