उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरतो कडुलिंब; जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 03:41 PM2019-04-07T15:41:09+5:302019-04-07T15:45:30+5:30

आयुर्वेदामध्ये कडुलिंबाचे अनेक औषधी गुणधर्म सांगण्यात आले आहेत. याशिवाय कडुलिंबांचा उपयोग अनेक धार्मिक विधींमध्येही करण्यात येतो. अनेक समारंभांमध्येही कडुलिंबाचा वापर करण्यात येतो.

Neem OR Kadulimba this is a cure for many diseases of the summer | उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरतो कडुलिंब; जाणून घ्या फायदे

उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरतो कडुलिंब; जाणून घ्या फायदे

googlenewsNext

आयुर्वेदामध्ये कडुलिंबाचे अनेक औषधी गुणधर्म सांगण्यात आले आहेत. याशिवाय कडुलिंबांचा उपयोग अनेक धार्मिक विधींमध्येही करण्यात येतो. अनेक समारंभांमध्येही कडुलिंबाचा वापर करण्यात येतो. तसेच याचे आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदेही आहेत. या झाडाची पानं, फळं आणि मुळांचेही अनेक औषधी गुणधर्म आहेत. ही चवीला कडू असली तरिही याचे फायदे मात्र आरोग्यासाठी गुणकारी ठरतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कडुलिंब अत्यंत फायदेशीर ठरतं. जर तुम्हीही उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या स्किन अ‍ॅलर्जी, खाज किंवा रॅशेज यांसारख्या समस्यांचा सामना करत असाल तर कडुलिंबाच्या वापराने सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. 

- जर सतत उन्हामध्ये फिरल्यामुळे टॅनिंगची समस्या उद्भवली असेल तर कडुलिंबाची पानं उकळून, पाणी थंड करा. या पाण्याने चेहरा स्वच्छ केल्यास टॅनिंगची समस्या दूर होऊन चेहऱ्याची त्वचा उजळ्यास मदत होते. 

- धूळ आणि वातावरणातील दूषित घटक त्वचेवर चिकटल्याने स्किन इन्फेक्शन किंवा रॅशेज येतात. त्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पानं एकत्र करू शकता. पण त्याआधी पानं धुवून घ्या. जेणेकरून त्यांच्यावरील धूळ निघून जाईल आणि काही वेळासाठी पाण्यामध्ये तशीच राहू द्या. त्यानंतर त्या पाण्याने आंघोळ करा. 

- सतत खाज येत असल्यास कडुलिंबाची पानं दह्यासोबत वाटून त्या जागेवर लावा. लगेच आराम मिळतो. 

- एखादी जखम झाल्यास कडुलिंबाच्या पानांचा लेप लावल्याने फायदा होतो. यासाठी ऑलिव्ह ऑइलसोबत कडुलिंबाच्या पांनाची पेस्ट तयार करून लावा. 

- मलेरिया झाल्याने कडुलिंबाच्या झाडाची साल पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा प्यायल्याने फायदा होतो. 

- त्वचेच्या समस्यांवर कडुलिंबाच्या तेलाचा वापर करणं लाभदायक ठरतं. कडुलिंबाच्या तेलामध्ये थोडासा कापूर एकत्र करून शरीरावर मालिश केल्याने त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात. 

- कडुलिंबाच्या खोडामध्ये खोकला, बद्धकोष्ट आणि पोटोच्या समस्या दूर करणारे गुणधर्म असतात.
 
- डोकेदुखी, दातदुखी, हातापायांना होणाऱ्या वेदना आणि छातीमध्ये होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी कडुलिंबाचं तेल मदत करतं.

टिप : वरील सर्व उपाय घरगुती असून आम्ही केवळ माहिती म्हणून हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणत्याही प्रकराचा दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Neem OR Kadulimba this is a cure for many diseases of the summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.