शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
5
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
6
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
7
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
8
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
9
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
10
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
11
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
12
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
13
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
14
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
15
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
16
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
17
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
18
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
19
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
20
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

आयर्नच्या जास्त प्रमाणामुळे फुप्फुसांच्या आजारांचे व्हाल शिकार, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 12:45 PM

हिमोग्लोबिन सिंथेसिसमध्ये आयर्नची भूमिका महत्वाची असते. शरीरातील हिमोग्लोबिन एक असा घटक आहे ज्यामुळे ऑक्सिजन सुरळीतपणे अवयवांपर्यंत पोहोचतो.  

आयर्न शरीरातील मह्त्वपूर्ण घटकांपैकी एक आहे. शरीरात आयर्नची कमतरता असल्यास एनिमियाची समस्या उद्भवण्याचा धोका असतो. एनिमिया या आजारात व्यक्तीच्या शरीरात रक्ताच्या कमतरतेसह पेशी कमी होण्याची समस्या  उद्भवते. अलिकडे करण्यात आलेल्या रिसर्चनुसार फुप्फुसांमध्ये आयर्नचं प्रमाण वाढल्यामुळे अस्थमासारखा गंभीर आजार होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला या रिसर्च बाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत.

शरीरासाठी आयर्न गरजेचं का आहे

आयर्नमधील पोषक घटकांची शरीराला आवश्यकता असते. हिमोग्लोबिन सिंथेसिसमध्ये आयर्नची भूमिका महत्वाची असते. शरीरातील हिमोग्लोबिन एक असा घटक आहे ज्यामुळे ऑक्सिजन सुरळीतपणे शरीरातील अवयवांपर्यंत पोहोचतो.  त्यामुळे उर्जा निर्मीतीची प्रक्रिया व्यवस्थित होते.

शरीरात आयर्न का जमा होतं?

आपल्या खाण्यापिण्याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. आहारातूनच शरीराला आयर्नचा पुरवठा होत असतो. पण आयर्नचे सेवन जास्त केल्यामुळे शरीराला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये आर्यन जास्त प्रमाणात जमा होत जातं. त्यामुळे रक्तवाहिन्या सुरळीतरित्या काम करत नाहीत. आयर्नचं प्रमाण फुप्पुसांच्या पेशींमध्ये जास्त झाल्यास अस्थमाची समस्या निर्माण होऊ शकते. 

फुप्फुसांवर असा होतो परिणाम

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फुप्फुसांमध्ये आयर्नचं प्रमाण जास्त झाल्यामुळे इंफ्लेमेशनची समस्या निर्माण होऊ शकते. इंफ्लेमेशन म्हणजेच सूज आल्यामुळे म्यूकस तयार होऊन श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे अस्थमाची लक्षणं दिसायला सुरूवात होऊ शकते. अशा स्थितीत रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. कारण फुप्फुसांना ऑक्सिजन मिळणं पूर्णपणे बंद होतं. ( हे पण वाचा-कॅन्सर नाही, तर स्तनांमध्ये गाठ होण्याची 'ही' आहेत कारणं, जाणून घ्या)

जर तुम्ही शरीरातील आयर्नची कमतरता पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक खाद्यपदार्थांचा समावेश करत असाल तर आरोग्याला कोणताही धोका नसतो. पण जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कॅप्सूल किंवा आयर्नच्या गोळ्यांचे सेवन करत असाल तर जीवघेणं ठरू शकतं. त्यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर आयर्नच्या गोळ्यांचे सेवन करा. (हे पण वाचा-घामामुळे अनेक गंभीर आजारांपासून राहता येईल दूर, वाचा घाम येण्याचे फायदे)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य