कॅन्सर नाही, तर स्तनांमध्ये गाठ होण्याची 'ही' आहेत कारणं, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 10:08 AM2020-05-05T10:08:37+5:302020-05-05T10:13:31+5:30

प्रत्येक महिलेच्या स्तनांमध्ये येणारी गाठ ही कॅन्सरची असते, असं नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे स्तनांमध्ये गाठ येऊ शकते.

How common causes is breast lump myb | कॅन्सर नाही, तर स्तनांमध्ये गाठ होण्याची 'ही' आहेत कारणं, जाणून घ्या

कॅन्सर नाही, तर स्तनांमध्ये गाठ होण्याची 'ही' आहेत कारणं, जाणून घ्या

googlenewsNext

महिलांमध्ये स्तनांच्या कॅन्सरची समस्या सर्वाधिक जाणवते. अनेकदा स्तनांमध्ये होणारी गाठ ही कॅन्सरचं कारण ठरू शकते. अनियमीत जीवनशैलीमुळे स्तनांच्या कॅन्सरचा धोका वाढत जातो. साधारणपणे ४५ ते ५० या वयोगटातील महिलांना या प्रकारच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो.  स्तनांमध्ये आलेली सुज किंवा गाठ याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यासाठी नियमीत स्तनांची तपासणी करणं गरजेंच आहे. प्रत्येक महिलेच्या स्तनांमध्ये येणारी गाठ ही कॅन्सरची असते, असं नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे स्तनांमध्ये गाठ येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला स्तनांमध्ये गाठ येण्याची कारणं सांगणार आहोत. 

हार्मोन्समधील बदल

वाढत्या वयात महिलांच्या स्तनांमध्ये वेगवेगळे बदल होतात. त्यामुळे गाठी येतात. मासिक पाळीदरम्यान बदल होतात.  यात स्तनांच्या आकार बदलतो. त्यामुळे स्तनांमध्ये गाठ येण्याची शक्यता असते. तुम्हालाही अशी लक्षणं जाणवत असतील तर त्वरित तपासणी करून घ्या.

मासिक पाळी

मासिक पाळी येण्याआधी आणि नंतर शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. ज्यामुळे महिलांच्या छातीला सूज येते.  अनेकदा तीव्र वेदना होता. ही समस्या मासिक पाळी येण्याच्या एक आठवडा आधीपासून सुरू होते. तर मासिक पाळी पूर्ण झाल्यानंतर या वेदना कमी होतात.

फाइब्रोडिनोमा

स्तनांमध्ये जर फाइब्रोडिनोमाची गाठ  झाली असेल तर घाबरण्याचे काहीही कारण नाही. ही गाठ कॅन्सरची नसते, साधारणपणे ४० ते ४५ वयोगटातील महिलांना अशी समस्या जास्त जाणवते. स्तनांमधील ग्रंथी जास्त वाढल्यामुळे गाठ  होण्याची शक्यता असते. (हे पण वाचा-हृदयासह पचनक्रियेसाठी फायदेशीर ठरतात भिजवलेले शेंगदाणे, इतर फायदे वाचून व्हाल अवाक्)

सिस्ट 

सिस्ट या  स्थितीमध्ये  स्तनांमध्ये झालेल्या गाठीत द्रवपदार्थ भरलेला असतो. ही गोलाकार आकाराची गाठ असते. ही गाठ दाबल्यानंतर आपल्या जागेवरून इतर ठिकाणी  सरकण्याची शक्यता असते. मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी किंवा मासिक पाळी सुरू असताना ही समस्या उद्भवते. पण मासिक पाळी संपल्यानंतरही ही समस्या कमी होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करायला हवी. (हे पण वाचा-घरी बसून शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढलंय का? 'या' लक्षणांनी ओळखा)

Web Title: How common causes is breast lump myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.