घामामुळे अनेक गंभीर आजारांपासून राहता येईल दूर, वाचा घाम येण्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 11:35 AM2020-05-05T11:35:14+5:302020-05-05T11:43:04+5:30

उन्हाळ्यात जरी तुम्हाला खूप घाम येत असेल, तरी शरीराला अनेक फायदे मिळतात.

know the benefits of sweating in summer myb | घामामुळे अनेक गंभीर आजारांपासून राहता येईल दूर, वाचा घाम येण्याचे फायदे

घामामुळे अनेक गंभीर आजारांपासून राहता येईल दूर, वाचा घाम येण्याचे फायदे

googlenewsNext

सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे दिवसेंदिवस वातावरणात गरमीचं प्रमाण वाढत चाललं आहे. घामापासून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर करतात. अलिकडे सगळ्यांचाच घरात एसी, ऑफिसमध्ये एसी असतात. त्यामुळे जराही घाम आला तरी लोक गरमीने हैराण होतात.

अनेकांना घाम आलेला सहनच होत नाही. आज आम्ही तुम्हाला घाम येण्याचे काय फाय़दे असतात. याबाबत सांगणार आहोत.  ऊन लागू नये म्हणून घराबाहेर न पडता घरीच थांबणं शक्य होत नाही. पण उन्हाळ्यात जरी तुम्हाला खूप घाम येत असेल तरी शरीराला अनेक फायदे मिळतात. घाम आल्यामुळे शरीरातील टॉक्सीन्स बाहेर निघून जाण्यास मदत होते. 

घाम येणं का गरजेंच आहे

घाम येणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीर या प्रक्रियेचा वापर करते. या प्रक्रियेद्वारे शरीरातील विविध रसायने आणि हार्मोन्स यांचे संतुलन कायम ठेवले जाते.  घाम आल्यामुळे शरीरातील रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते. 

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

तुम्ही नेहमी पाहिलं असेल  की कोणतीही व्यक्ती व्यायाम करत असताना  त्या व्यक्तीला खूप घाम येत असतो. कारण शरीरातील कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे सतत घाम येतो. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स सुद्धा बाहेर पडतात. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर घाम येणं खूप गरजेचं आहे. कारण कॅलरीज बर्न होण्यासाठी घाम येणं महत्वाचं असते. 

डिटॉक्स 

नेहमी घाम आल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहरे पडत असतात. त्यामुळे नुकसानकारक टॉक्सिन्स शरीराबाहेर पडायला मदत होते. याशिवाय अल्कोहोल आणि मीठाला शरीरातून बाहेर काढण्यासाठी घाम येणं गरजेंच असतं. त्यामुळे त्वचेतील मृतपेशी निघून जाऊन त्वचा तजेलदार दिसते.

तापमान नियंत्रणात ठेवणं

उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे शरीरातील तापमान कमी जास्त होत जातं. त्यामुळे अस्वस्थता वाटते. घाम आल्यामुळे शरीरातील तापमान नियंत्रणात राहते. यामुळे तुम्ही  आजारांपासून लांब राहू शकता. ( हे पण वाचा-हृदयासह पचनक्रियेसाठी फायदेशीर ठरतात भिजवलेले शेंगदाणे, इतर फायदे वाचून व्हाल अवाक्)

तुम्हाला जास्त  घाम येत असेल तर अशी घ्या काळजी

जर तुम्हाला जास्त घाम येत असेल तर  अँटी बॅक्टेरिअल साबणानेच अंघोळ करा. अशा साबणामुळे त्वचेवर विषाणूंची निर्मिती होत नाही. तसंच आपल्या घामाला वास येत नाही.  

शक्यतो सुती कपडे घाला, जास्तीत जास्त पाणी प्या

घाम  नेहमीपेक्षा खूपच जास्त येत असेल, तर डॉक्टरांचा सल्‍ला घेणं आवश्यक ठरते.

हिरव्या ताज्या भाज्यांचा आहारात समावेश करा.

स्वच्छ आणि रोज वापरात असलेल्या टॉवेलचा वापर करा. (हे पण वाचा-कॅन्सर नाही, तर स्तनांमध्ये गाठ होण्याची 'ही' आहेत कारणं, जाणून घ्या)

Web Title: know the benefits of sweating in summer myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.