Kerala Floods : केरळमध्ये महापूरानंतर लेप्टोस्पायरोसिस रोगाचं थैमान; जाणून घेऊयात लक्षणं आणि उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 01:47 PM2018-09-03T13:47:29+5:302018-09-03T13:48:32+5:30

Kerala Floods : सलग पडलेल्या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये आलेला पूर आता ओसरला असून पुरामुळे झालेल्या नुकसानाचे विदारक चित्र समोर येऊ लागले आहे.

Kerala Floods : kerala has seen a spurt in communicable diseases leptospirosis | Kerala Floods : केरळमध्ये महापूरानंतर लेप्टोस्पायरोसिस रोगाचं थैमान; जाणून घेऊयात लक्षणं आणि उपाय!

Kerala Floods : केरळमध्ये महापूरानंतर लेप्टोस्पायरोसिस रोगाचं थैमान; जाणून घेऊयात लक्षणं आणि उपाय!

Next

Kerala Floods : सलग पडलेल्या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये आलेला पूर आता ओसरला असून पुरामुळे झालेल्या नुकसानाचे विदारक चित्र समोर येऊ लागले आहे. गॉड्स ओन कंट्री म्हणून ओळखलं जाणारं हे राज्य जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. देश विदेशातून केरळच्या पुनर्वसनासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. अनेक कॅम्पेनमार्फत केरळसाठी मदतीचा निधी जमा करण्यात येत आहे. पण अद्याप केरळसमोर उभी असणारी संकटं संपली नाहीत. पुराचं संकट दूर झाल्यानंतर आता केरळमध्ये अनेक गंभीर आजारांनी डोकं वर काढलं आहे. अनेक लोकांना या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून अनेकजण या रोगांमुळे मरण पावले आहेत.



स्टेट इन्टिग्रेटेड डिसीज सर्व्हेलिअस प्रोजक्ट (State Integrated Disease Surveillance Project) यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मागील 15 दिवसांत लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) या आजाराचे एकूण 171 रूग्ण समोर आले असून त्यातील 46 लोकांचा मृत्यू झाला आहे. लेप्टोस्पायरोसिस हा एक जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. हा आजार प्राण्यांच्या मुत्रामार्फत दूषित पाणी किंवा मातीतून पसरतो. 

राज्यामध्ये चिकन पॉक्स म्हणजेच कांजण्यांचीही साथ पसरली आहे. आतापर्यंत चिकन पॉक्सचे 1617 रूग्ण आढळून आले असून त्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय हेपेटाइटिस ए (Hepatitis A) चे 1,044 रूग्ण समोर आले असून आतापर्यंत यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. 

जानेवारीपासून ते 1 सप्टेंबर 2018पर्यंत केरळमध्ये 36 लोकांचा मृत्यू झाला असून 788 लेप्टोस्पायरोसिसचे रूग्ण आढळून आले आहेत. तसेच चिकन पॉक्समुळे 15 लोकांचा मृत्यू  झाला असून एकूण 21,915 रूग्ण आढळून आले होते. त्याचसोबत स्क्रब टाइफसमुळे  (Scrub Typhus) 2 लोकांचा मृत्यू झाला असून 141 प्रकरणं समोर आली आहेत. 

लेप्टोस्पायरोसिस काय आहे?

दिल्लीचे जनरल फिजिशियन डॉक्टर अजय लेखी यांनी सांगितल्यानुसार, हे एक बॅक्टेरिअल इन्फेक्शन आहे. जे प्राण्यांमुळे होतं. कुत्रा. उंदीर आणि शेतात आढळून येणाऱ्या इतर प्राण्यांच्या मलमुत्रामुळे हा रोग होतो. या रोगाची विशिष्ट अशी काही लक्षणं दिसून येत नाहीत. याकडे दुर्लक्ष केल्यास जीवालाही धोका असतो. हा आजार झालेल्या रूग्णांमध्ये छातीत दुखणं, हाता पायांना सूज येणं डोकेदुखी, उलट्या होणं यांसारखी लक्षणं आढळून येतात. 

असा पसरतो लेप्टोस्पायरोसिस

लेप्टोस्पायरोसिस लेप्टोस्पिरा इंचरऑर्गन नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. हा बॅक्टेरिया अनेक प्राण्यांच्या किडनीमध्ये असतो. या आजाराची लागण झालेल्या रूग्णाच्या तोंडामार्फत किंवा नाकामार्फत इतरांनाही होऊ शकतो. 

लेप्टोस्पायरोसिसची लक्षणं

साधारणतः दोन आठवड्यांमध्ये लेप्टोस्पायरोसिसची लक्षणं दिसण्यास सुरुवात होते. काही प्रकरणांमध्ये ही लक्षणं एका महिन्यानतर दिसू लागतात. या रोगाची लागणं झाल्यानंतर याचे रूग्णाच्या शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात. त्यादरम्यान रूग्णाला 104 डिग्री सेल्सिअसपर्यंत ताप येऊ शकतो.  याशिवाय डोकेदुखी, स्नायूंना वेदना होणं, उलट्या होणं तसेच त्वचेवर लाल डाग उठणं ही लक्षणं दिसून येतात. 

लेप्टोस्पायरोसिसपासून वाचण्यासाठी करा हे उपाय

1. दूषित पाण्यापासून दूर रहा.
पावसाळ्यात होणाऱ्या दूषित पाण्यापासून शक्य तेवढं दूर रहा. यामुळे अनेक गंभीर आजार पसरण्याची शक्यता असते. 

2. उंदीर आणि इतर प्राण्यांपासून दूर रहा
जर तुमच्या घरांमध्ये किंवा आजूबाजूला उंदीर असतील तर त्यांना पळवून लावण्यासाठी प्रयत्न करा. 

3.  अस्वच्छ शौचालयांमध्ये जाणं टाळा
जर तुम्ही अस्वच्छ अशा शौचालयांचा वापर करत असाल तर त्यांचा वापर करणं टाळा. घरातील शौचालयंही स्वच्छ ठेवा. कोणताही त्रास होऊ लागल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करा.

Web Title: Kerala Floods : kerala has seen a spurt in communicable diseases leptospirosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.