(Image credit-personal today
महिला आणि पुरूषांपाठोपाठ मधुमेह तरुण मुलांमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या आजारामुळेच रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या उद्धभवत आहेत. सध्याच्य काळात या जीवघेण्या आजारांपासून सुटका मिळवायची असल्यास आहारकडे लक्ष देणे गरजेचं आहे. आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा. तसेच खाण्यापिण्यात कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात. जाणून घ्या.
आहारात धान्य, कडधान्य, शेंगदाणे आणि कमी चरबीयुक्त दूधयुक्त पदार्थांचा समावेश असायला हवे. साखर आणि मैदा (बारीक गव्हाचे पीठ) आणि पॉलिश तांदळाचा वापर कमी असावा. तूप आणि लोणी सारख्या जास्त चरबी तसेच अधिक तळलेल्या पदार्थांमध्ये तयार होणारी ट्रान्स-फॅट टाळली पाहिजे.
मधुमेहाच्या रुग्णाने नियमित व्यायाम करायला हवा. चालणे, जॉगिंग, ट्रेडमिल किंवा पोहणे यासारख्या कॅलरी / साखर जाळणारे व्यायाम प्रकार करावेत. योगा देखील वेळापत्रकात समाविष्ट केलं जावं. कारण नियमितपणे केलेला व्यायाम मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती राखतो आणि हृदयाचे रक्षण करतो.
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषधे वेळेवर घेतली पाहिजे. जेवणाच्या वेळी तोंडावाटे गोळ्या असो की इन्सुलिन घेणे महत्वाचे असते. मधुमेहावरील इंसुलिन सुरू करण्यास विलंब करू नये (गरज असल्यास) यावरील इंसुलिन जवळजवळ वेदनारहित असतात. परिस्थितीनुसार इंसुलिन अल्प कालावधीसाठी लिहून दिले जाऊ शकते.
रुग्णाने किमान ३ महिन्यातुन एकदा डॉक्टरांना नियमित भेट द्यायला हवी. वर्षातून एकदा मधुमेहाशी संबंधित विविध आजारांसाठी रुग्नाने डॉक्टरांकडून परीक्षण करून घ्यायला पाहिजे. वर्षातून एकदा किडनी, डोळयातील पडदा आणि मज्जातंतूंच्या कार्याची चाचणी घ्यावी. त्याचप्रमाणे हृदयाची तपासणी करण्यासाठी, मोठ्या रक्तवाहिन्या (मॅक्रोव्हॅस्क्युलर) गुंतागुंतीची तपासणी करण्यासाठी वर्षातून एकदा ईसीजी करता येते. उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल सारख्या आजारांवरही लक्ष ठेवले पाहिजे. कारण यामुळे स्वतंत्रपणे हृदयविकाराचा धोका वाढतो.