शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

​घरगुती उपायांनी घालवा ‘स्ट्रेच मार्क्स’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 16:12 IST

बहुतांश महिलांना स्ट्रेच मार्क्सची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असते. साधारणत: अचानक वजन वाढल्याने किंवा कमी झाल्याने पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर किंवा पार्श्व भागावर स्ट्रेच मार्क्स येतात.

-Ravindra Moreबहुतांश महिलांना स्ट्रेच मार्क्सची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असते. साधारणत: अचानक वजन वाढल्याने किंवा कमी झाल्याने पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर किंवा पार्श्व भागावर स्ट्रेच मार्क्स येतात. विशेष म्हणजे प्रेगन्सीमध्ये किंवा टीनएजर्स (ज्यांच्यामध्ये पौगंडावस्थेत हार्मोनल चेंजेस होतात) याचे प्रमाण जास्त असते. आजच्या सदरात घरगुती उपायांनी स्ट्रेच मार्क्स कसे घालविता येतील याबाबत जाणून घेऊया.* कोरफडीमध्ये त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्याची क्षमता असल्याने ते स्ट्रेच मार्क्सवर अत्यंत गुणकारी आहे. यासाठी कोरफड कापून त्याच्यातील गर स्ट्रेच मार्क्सवर लावा. असे नियमित केल्याने स्ट्रेच मार्क्स हळूहळू कमी होतील. कोरफडीचा गर व्हिटॅमिन ‘इ’ आॅइल मध्ये घालून ते मिश्रण देखील तुम्ही वापरू शकता.* त्वचेतील आर्द्रता टिकविण्यासाठी खोबरेल तेल, एरंडेल तेल त्याचबरोबर आॅलिव्ह आॅइलचा वापर केला जातो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी आॅलिव्ह आॅइल थोडं गरम करून स्ट्रेच मार्क्स वर लावा. सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करा. आॅलिव्ह आॅइल आणि खोबरेल तेल एकत्र करून ही तुम्ही लावू शकता. एरंडेल तेल वापरताना कोमट करून स्ट्रेच मार्क्स वर लावा आणि कपडा गरम पाण्यात ओला करून त्याभोवती गुंडाळून ठेवा. कपड्याऐवजी प्लास्टिक शीटचा देखील तुम्ही वापर करू शकता किंवा गरम पाण्याच्या पिशवीने तो भाग शेकवा. वाफेमुळे त्वचेचे पोर्स ओपन होतात आणि तेल आत मुरायला मदत होते.* स्ट्रेच मार्क्सवर अंड्यातील पांढरा भागही अत्यंत गुणकारी आहे, कारण त्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. यासाठी २ अंड्यांचा पांढरा भाग घेऊन स्ट्रेच मार्क्सवर जाडसर थर लावा. थर पूर्णपणे सुकल्यावर पाण्याने स्वच्छ करा. आणि मग त्यावर आॅलिव्ह आॅइल लावा. * लिंबू मधील आम्ल गुणधर्म तसेच नैसर्गिक ब्लिच असल्याने स्ट्रेच मार्क्स घालविण्यास मोठी मदत होते. यासाठी लिंबाचा रस सावकाश स्ट्रेच मार्क्स वर लावा. १० मिनिटं ठेऊन गरम पाण्याने धुवून टाका. दिवसातून १-२ वेळा असे केल्याने चांगला फरक पडतो.* स्ट्रेच मार्क्सच्या ठिकाणी मॉयश्चरायझर वापरल्यानेही खूप फायदा होतो. त्यामुळे त्वचेत ओलावा टिकून राहण्यास मदत होऊन त्वचेची लवचिकता सुधारते आणि त्याचा परिणाम म्हणजे स्ट्रेच मार्क्सची तीव्रता कमी होते. कोको बटर किंवा कोरफड युक्त मॉयश्चरायझर नियमित वापरा किंवा सम प्रमाणात कोरफड आणि आॅलिव्ह आॅइल एकत्र करून घरच्या घरी मॉयश्चरायझर तयार करा.* खूप काळापासून असलेले स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी व्हिटॅमिन ‘इ’ युक्त आॅइलचा नियमित वापर करा. व्हिटॅमिन ‘इ’ मध्ये ‘अ‍ॅन्टिआॅक्सिडेंट प्रॉपर्टिज’असल्यामुळे ‘कोलॅजन’डॅमेज होण्यापासून बचाव होतो. म्हणजेच त्वचा सुरक्षित राहते.