शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

Holi 2018 : होळीत केस व त्वचेची काळजी कशी घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 11:19 AM

जवळपास प्रत्येक जण होळीच्या उत्सवात सहभागी होत असतो.

- अमित सारडा, वेलनेस अँड ब्युटी एक्स्पर्ट

जवळपास प्रत्येक जण होळीच्या उत्सवात सहभागी होत असतो. मात्र, अनेकदा होळीच्या दुस-या दिवशी त्वचा फुटते, चेह-यावर पुरळ येतात आणि आनंदावर विरजण पडते. या वर्षी होळी खेळताना अशा प्रकारची समस्या उद्भवू नये, यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी याचा हा ऊहापोह...

होळीच्या आधी काय कराल- होळीत त्वचा आणि केसांवर परिणाम करणारा घटक म्हणजे, होळी खेळताना वापरले जाणारे हानिकारक रासायनिक रंग. ही रसायने तुमच्या त्वचेत प्रवेश करू नयेत, यासाठी काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

- त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे, होळी खेळण्याआधी संपूर्ण शरीराला कॅस्टर आॅइल लावावे. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडणार नाही आणि धोकादायक रंगांचा त्वचेवर परिणाम होणार नाही.

- प्रामुख्याने कानाच्या मागील बाजूला, कानाच्या पाळीजवळ आणि नखांवर तेल लावण्यास विसरू नका. कारण या ठिकाणी रंग सहजपणे टिकून राहण्याची सर्वाधिक शक्यता असते.

- होळीच्या आदल्या रात्री तुमचे केस तेल लावून तयार करावेत. डोक्याची त्वचा आणि केसांना कॅस्टर ऑइलने मसाज करावा.

- असे केल्याने केसांना तेलामुळे अतिरिक्त पोषण तर मिळेल आणि रंगांमुळे केस कोरडेही पडणार नाहीत. त्याशिवाय असे केल्याने त्वचेवरचा रंग लवकर आणि सहजपणे निघून जातो.

- तुमच्या डोक्याची त्वचा संवेदनशील असल्यास, कॅस्टर आॅइलमध्ये लेमन इसेंशियल ऑइलचे काही थेंब टाका. त्यामुळे रंगांतील रसायनांमुळे होणारी बाधा ही टाळता येतो.

होळीनंतर काय कराल- रंग काढण्यासाठी साबणाने तुमची त्वचा जोरजोरात चोळू नका. पपई-काकडीपासून अथवा चंदनापासून तयार केलेल्या सौम्य साबणाचा वापर करा. त्यात त्वचेला आर्द्रता देण्याचे आणि त्वचा स्वच्छ करण्याचे गुणधर्म असतात.

- त्यानंतर त्वचेवर आॅलिव्ह आॅइल लावा. हे तेल हलके असल्याने ते त्वचेमध्ये त्वरित मुरते, शिवाय यात असलेल्या ‘ई’ जीवनसत्त्व आणि अँटी आॅक्सिडंट्समुळे ते त्वचेचे कंडिशनिंग उत्तम प्रकारे करते आणि त्वचा कोरडी पडत नाही.

- सर्वप्रथम तुमचे केस कोरडे रंग आणि मायकाचे लहान कण काढून टाकण्यासाठी भरपूर पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर, एसएलएस मुक्त रोझमेरी लॅव्हेंडर साबणाने केस धुऊन घ्या.

- तरीही केसांवर काही रंग मागे राहिला असेल, तर त्याच दिवशी केस धुऊ नका. त्यामुळे केस अधिक कोरडे होऊन विस्कटल्यासारखे दिसतील. केस वाळले की, त्यानंतर आॅलिव्ह ऑइलनी केसांना मसाज करा. दुसºया दिवशी केस धुऊन घ्या. या तेलामुळे केस निरोगी, मजबूत आणि चमकदार होतात.

- केस गळणे नियंत्रणात येते. डोक्याच्या कोरड्या झालेल्या त्वचेचे पोषण होते आणि केसांचा गुंता कमी होतो.

- केसांना अधिक हायड्रेटेड ठेवायचे असेल, तर तुम्ही सिट्रोनेला इसेंशियल आॅइल तुमच्या आफ्टर वॉश हेअर सिरममध्ये मिसळून ते लावावे. या इसेंशियल आॅइलमुळे केसांचे कंडिशनिंग उत्तम होते. ते घनदाट, गुंतामुक्त तर होतातच, शिवाय अधिक मऊ आणि निरोगी दिसू लागतात.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHoliहोळीHoli 2018होळी २०१८