Herd immunity in india coronavirus outbreak in india cross 38 crore says ijmr study | काळजी वाढली! देशाची हर्ड इम्यूनिटीच्या दिशेने वाटचाल; ३८ कोटी लोक संक्रमित, रिसर्च

काळजी वाढली! देशाची हर्ड इम्यूनिटीच्या दिशेने वाटचाल; ३८ कोटी लोक संक्रमित, रिसर्च

देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना रुग्णांनी  ७७  लाखांचा टप्पा पार केला आहे.  दरम्यान कोरोनाच्या प्रसाराबाबत एक चिंताजनक बाब समोर येत आहे. तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार जवळपास  ३८ कोटी लोक कोरोना संक्रमित झाले असून आता देश हर्ड इम्यूनिटीच्या स्थितीकडे वळत आहे. देशात कोरोना संक्रमणाची लाट दिसत असून आता सरकारने कम्यूनिटी ट्रांसमिशन होत असल्याची बाब मान्य केली आहे. आता लक्षण असलेले, नक्षण नसलेले, संक्रमित आणि कोरोनातून बरे झालेले अशा सगळ्या प्रकारच्या  लोकांमध्ये वाढ झाली आहे.

भारतात कोरोना व्हायरसबाबत एसएआयआर म्हणजेच Susceptible asymptomatic infected recovered मॉडेल अंतर्गत एक रिसर्च केला जात करण्यात आला होता. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चकडून प्रकाशित झालेल्या या अभ्यासात सांगण्यात आले आहे की, भारतात एकूण  ३८ टक्के लोक हर्ड इम्यूनिटीच्या स्टेजपर्यंत पोहोचले आहेत. या रिसर्चचा अहवाल मनिंद्रा अग्रवाल, माधुरी कानिटकर आणि एम विद्यासागर यांनी लिहिला आहे. दरम्यान हर्ड इम्यूनिटीच्या स्थितीत भारतातील मोठी लोकसंख्या असली तरी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. 

सतह पर रहता है वायरस

अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार या रिसर्चमध्ये नमुद करण्यात आले होते की, लॉकडाऊनमुळे कोराना संक्रमणाचा वेग कमी झाला. मार्चमध्ये लॉकडाऊन झालं नसतं तर जूनमध्ये कोरोना संक्रमणाची मोठी लाट पाहायला मिळाली असती.  SAIR मॉडलनुसार लोकसंख्येच्या तुलनेत भारतात कमी प्रमाणात चाचण्या घेण्यात आल्या. जे लोक कोरोना संक्रमणाचा सामना करत होते पण लक्षणं दिसत नव्हती अशा लोकांना संक्रमणाबाबत कल्पनाही मिळाली नसेल. सरकारच्या आकडेवारीनुसार  १७ सप्टेंबरला कोरोनाची लाट दिसून आली होती. राजधानी दिल्लीमध्ये हा वेग २० टक्के जास्त होता.  दिल्लीतील सिरो सर्वेनुसार जवळपास  २४ टक्के लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं होतं. दिलासादायक! भारतात १०० स्वयंसेवकांवर होणार स्पुटनिक-व्ही लसीची चाचणी, सरकारनं दिली परवानगी

SAIR मॉडलवर करण्यात आलेल्या या रिसर्चनुसार लॉकडाऊन करण्यात आलं नसतं तर २० लाखांपेक्षा जास्त लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला असता. एप्रिल ते मे दरम्यान लॉकडाऊनमुळे जवळपास १० लाख मृत्यू टाळता आले. या रिसर्चमधील माहितीनुसार कोरोना संक्रमणाबाबत अजूनही योग्य आकडेवारी उलब्ध झालेली नाही. चिंताजनक! पुढची २० वर्ष कोरोना लसीची गरज भासणार, आदर पुनावालांनी सांगितले कारण...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Herd immunity in india coronavirus outbreak in india cross 38 crore says ijmr study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.