....म्हणून शरीरावर रक्त गोठण्याच्या खुणा दिसतात; वेळीच जाणून घ्या लक्षणं आणि उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 01:57 PM2020-09-17T13:57:32+5:302020-09-17T14:03:12+5:30

तुम्हाला शरीरावर रक्त गोठण्याच्या खुणा दिसण्याची कारणं आणि उपाय सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. 

Health Tips : Signs of blood clotting in the body; Know the symptoms remedies | ....म्हणून शरीरावर रक्त गोठण्याच्या खुणा दिसतात; वेळीच जाणून घ्या लक्षणं आणि उपाय 

....म्हणून शरीरावर रक्त गोठण्याच्या खुणा दिसतात; वेळीच जाणून घ्या लक्षणं आणि उपाय 

googlenewsNext

ब्लड क्लोटींग म्हणजेच रक्त गोठण्याची समस्या अनियमीत जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  जेव्हा नसांमध्ये रक्त गोठण्याची समस्या उद्भवते त्यावेळी शरीरावर नकारात्मक परिणाम होतो.  रक्त गोठण्याच्या सुरूवातीच्या लक्षणांना ओळखल्यास गंभीर आजारांपासून बचाव करता येऊ शकतो.  आज आम्ही तुम्हाला शरीरावर रक्त गोठण्याच्या खुणा दिसण्याची कारणं आणि उपाय सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. 

शरीरात रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून रक्त पोहोचतं आणि हृदयातून पंपींग  व्यवस्थित झाल्यानंतर शरीरातील अवयवांपर्यंत रक्तपुरवठा होतो. या क्रियेदरम्यान अनेकदा रक्त  गोठण्याची समस्या उद्भवते. रक्त गोठल्यास काही संकेत शरीरात दिसायला सुरूवात होते.


 

लक्षणं

जास्त घाम  घेणं

भीती वाटणं

अशक्तपणा वाटणं

हात पाय सुन्न होणं

चालताना त्रास होणं 

चक्कर येणं  

लठ्ठपणा

पाळी येणं बंद होणं

श्वास घ्यायला त्रास होणं किंवा दम लागणं 

उपाय 

संतुलिक आहार घेतल्यास तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकताय व्हिटामीन के असलेल्या पदार्थाचे सेवन ही समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं.  शरीरात रक्त गोठण्याची क्रिया उद्भवत नाही. महिलांनी त्यासाठी 90 micrograms आणि पुरूषांनी 120 mcg  व्हिटामीन के चं सेवन करायला हवं

पालक 

पालकाचे नियमितपणे सेवन केले पाहिजे. व्हिटॅमिन के , मिनरल्स आणि अल्फा लिपोइक एसीड पालकमध्ये आढळते. यामुळे शरिरातील ग्लूकोजचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. याशिवाय कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी पालक खाणे आरोग्याच्यादृष्टीने फायद्याचे आहे.

ब्रोकोली

ब्रोकोली मधील पोषक घटक तुमच्या ह्रदयासाठी उपयुक्त असतात. नियमित ब्रोकोली खाण्यामुळे ह्रदयातील रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. शिवाय यामुळे तुम्हाला ह्रदयविकार होण्याचा धोकाही कमी होतो. ब्रोकोलीमध्ये व्हिटामनी के सोबतच फायबर्स असतात. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी ब्रोकोलीचा आहारात समावेश करायला हवा.

सोयाबीन

सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. सोयाबीनमध्ये व्हिटामीन के असते.  आहारामध्ये सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांच्या कमकुवतपासून आराम मिळतो.  याशिवाय रोज अर्धा किंवा एक तास काढून जर तुम्ही व्यायाम केलात तर या समस्येचा सामना करावा लागणार नाही.

हे पण वाचा-

काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा

मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध

अरे व्वा! कोरोनाशी लढण्यासाठी 'या' २ गोष्टी ठरतील रामबाण उपाय; अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

'कोरोना तर काहीच नाही; अजून २ मोठी संकटं येणार'; प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

Web Title: Health Tips : Signs of blood clotting in the body; Know the symptoms remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.