मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 07:05 PM2020-09-15T19:05:19+5:302020-09-16T11:51:54+5:30

CoronaVirus News & Latest Updates : प्रत्यक्षात हा एंटीबॉडीचाच एक भाग आहे. सामान्य आकाराच्या  एंटीबॉडीजपेक्षा १० पटीनं लहान आहे.

CoronaVirus : Scientists breakthrough ab8 drug treatment prevention coronavirus | मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध

मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध

Next

कोरोना संसर्गाचं प्रमाण दिवसेंदिवस जगभरात वाढत चाललं आहे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अनेक ठिकाणी लॉकडाऊन पूर्णपणे उघडण्यात आलेला नाही. कोरोनाची लस किंवा औषध कधी तयार होणार याकडे संपूर्ण जगाचं लक्षं आहे. कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन (UPMC) च्या शास्त्रज्ञांना कोरोना व्हायरसच्या उपाचारांबाबत मोठं यश मिळालं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार याद्वारे सग्ळ्यात लहान बायोलॉजिकल मॉलेक्यूल्सना वेगळं करण्यात आलं आहे. याद्वारे कोरोना व्हायरसला न्यूट्रलाईज करता येऊ शकतं. 

नवीन एका मॉलेक्यूलच्या साहाय्यानं  शास्त्रज्ञांनी Ab8 हे औषध तयार केलं आहे. प्रत्यक्षात हा एंटीबॉडीचाच एक भाग आहे.  सामान्य आकाराच्या  एंटीबॉडीजपेक्षा १० पटीनं लहान आहे. उंदरांवर सगळ्यात आधी या औषधांचं परिक्षण करण्यात आलं होतं. हे औषध  दिल्यानंतर  कोरोनामुळे संक्रमित होण्याचा धोका १० टक्क्यांनी कमी झालेली दिसून आला. हे मॉलेक्यूल्स मानवी पेशींच्या संपर्कात येत नाहीत. त्यामुळे साईड इफेक्ट्स होण्याचा धोका नसतो. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या उपाचारांसाठी Ab8 हे औषध महत्वपूर्ण ठरू शकतं. 

युनिवर्सिटी ऑफ पिट्सबर्गमधील संक्रामक रोग विभाग प्रमख आणि साहाय्यक लेखक जॉन मेलर्स यांनी सांगितले की,  Ab8 कोरोना रुग्णांच्या उपचारात एका थेरेपीप्रमाणे काम करेल. कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी परिणामकारक ठरू शकते.  या औषधाची लवकरात लवकर मानवी चाचणी करण्यात येणार आहे. या औषधाचे मुल्यांकन युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी केलं आहे. आतापर्यंतच्या चाचणीत  हे औषध व्हायरसला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखत असल्याचे दिसून आलं आहे. 

COVID-19

आता बिल गेट्स यांनी सांगितलं; भारतात कधी येणार कोरोनाची लस; जाणून घ्या

बील गेट्स यांनी पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला किमान 3 लशी बाजारात येतील, अशी आशा व्यक्त केली आहे.  कोरोनाची लस तयार करत असलेल्या ६ पैकी ३ कंपन्यांच्या लसी पुढच्या वर्षी उपलब्ध होतील. असं गेट्स म्हणाले. पुढच्या वर्षांच्या पहिल्या तीन महिल्या कोरोनाच्या अनेक लसी या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेल्या असतील. वृत्तसंस्था PTI शी बोलताना त्यांनी लशीबद्दलचं त्यांचं मत व्यक्त केलं. कोरोना लशीच्या निर्मितीमागे भारताची भूमिका जगात फार महत्त्वाची ठरणार आहे. इतर देशांमध्ये तयार होणाऱ्या लशींपेक्षा पाश्चिमात्य देश तयार करत असलेली लस त्यांना अधिक खात्रीलायक वाटते, कारण पाश्चिमात्य देशांमध्ये लस निर्मितीपूर्वीच्या चाचण्यांचे निकष अधिक कठोर आणि दर्जात्मक आहेत.

त्यामुळे याच लशींकडून जगाला जास्त आशा आहे. पाश्चिमात्य देशातील काही कंपन्याशी भारतीय कंपन्यांनी उत्पादनासाठी करार केले आहेत. भारत कोरोना लशीचं उत्पादन करणारा जगातला सगळ्यात बलाढ्य देश ठरेल, असंही गेट्स म्हणाले.कोरोनाच्या वाढत्या प्रसारात  जगभरातील लस निर्मीतीच्या प्रक्रियेवर  लक्ष ठेवून असणाऱ्या बिल गेट्स लसीबाबत व्यक्त केलंलं मत हे दिलासादायक ठरलं आहे. 

हे पण वाचा-

अरे व्वा! कोरोनाशी लढण्यासाठी 'या' २ गोष्टी ठरतील रामबाण उपाय; अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

'कोरोना तर काहीच नाही; अजून २ मोठी संकटं येणार'; प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

Web Title: CoronaVirus : Scientists breakthrough ab8 drug treatment prevention coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.