Noam chomsky we have little time left to decide whether human life will survive | 'कोरोना तर काहीच नाही; अजून २ मोठी संकटं येणार'; प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

'कोरोना तर काहीच नाही; अजून २ मोठी संकटं येणार'; प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

कोरोनाने गेल्या सहा महिन्यांपासून जगभरात कहर केला आहे. जगभरातील सर्वात जास्त रुग्ण अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील भाषावाद आणि राजनैतिक विश्लेषक नॉम चॉम्स्की यांनी दावा केला आहे की, कोरोनाची माहामारी ही घातक असली तरी या दोन संकटांपेक्षा खूपच लहान आहे.  डीआययएम-25 टीव्हीशी बोलताना  ९१ वर्षीय विश्लेषक नॉम चॉम्स्की यांनी सांगितले की,'' कोरोना व्हायरस हा ट्रम्प सरकारच्या काळात आला असून दिवसेंदिवस जास्त धोकादायक ठरत आहे. कोरोना व्हायरसचे भयंकर परिणाम जगभरात दिसून येत आहेत. पण आपण सगळेचजण यामधून बाहेर येऊ शकतो. पण इतर दोन संकटापासून वाचणं कठीण आहे. यामुळे सर्वच उधवस्त होऊ शकतं. अमेरिकेची वाढत जाणारी क्षमता विनाशाचं कारण ठरू शकते. ''

डाऊन टू अर्थ पत्रात छापण्यात आलेल्या या मुलाखतीत नॉम्स चॉम्स्की यांनी सांगितले की, ''क्यूबा यूरोपची मदत करत आहे पण जर्मनी ग्रीसची मदत करण्यासाठी तयार नाही. कोरोना व्हायरसची माहामारी  आपल्या कशाप्रकारचं जग हवयं असा विचार करण्यास प्रवृत्त करत आहे. सार्स माहामारी स्वरूप बदलून कोरोना व्हायरसच्या रुपात समोर येऊ शकते. याची कल्पना आधीपासूनच होती. श्रीमंत देश कोरोना व्हायरसच्या लसीवर काम करू शकत होते. परंतू त्यांनी असं काही केलेलं नाही. मनमानी पद्धतीनं औषध आणि लसीचा कारभार केला जात आहे. 

पुढे ते म्हणाले की,'' ऑक्टोबर २०१९ मध्ये अमेरिकेनं कोरोनासारख्या माहामारीबाबत शंका व्यक्त केली होती. पण कोणीही या कडे फारसं लक्ष दिलं  नाही. ३१ डिसेंबरला चीननं जागतिक आरोग्य संघटनेला निमोनिया बाबत सुचित केलं त्यानंतर एका आठवड्यानंतर चीनी वैज्ञांनिकांनी कोरोना व्हायरसचं रुप ओळखलं. त्यानंतर संपूर्ण जगाला याबाबत कल्पना देण्यात आली.  आज २ कोटींपेक्षा जास्त लोक क्वारंटाईन आहेत. सामाजिक भेद अनेक वर्षांपासून चालत आला आहे. त्यामुळे मोठं नुकसानही होतआहे. या महामारीतून बाहेर येण्याससाठी यातून बाहेर यायला हवं. गरजवंताची मदत करायला हवी. गरजवंताची मदत करणं, विकास  कारायला हवा. या समस्यांवर विचारविमर्श करून त्यावर उपाय शोधायला हवेत. ''

राज्यात झपाट्यानं होतोय कोरोनाचा प्रसार; आता मृतांचीही रॅपिड एंटीजन टेस्‍ट होणार

देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमणानं हाहाकार निर्माण केला आहे. तर राज्यात १० लाखांपेक्षा अधिक लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे.  आतापर्यंत २९ हजार लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत आता मृतांची एंटीजन टेस्ट करण्याचा करण्याचा निर्णय सरकारने  घेतला आहे. याद्वारे रुग्णालयात दाखल होत असलेल्या प्रत्येक  मृत व्यक्तीची एंटीजन टेस्ट करून त्यावेळी ती व्यक्ती कोरोना संक्रमित होती की नाही हे पाहिलं जाणार आहे. 

सरकारने सध्या टीबीच्या चाचणीसाठीही परवागनी दिली आहे. या टेस्टद्वारे व्यक्तीला कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला होता का, हे पाहिलं जाणार आहे. चाचणीनंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल. देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे शवगृहांमध्ये जागा शिल्लक नाही. ससून सरकार रुग्णालयात एका दिवसात जवळपास ४० ते ५० लोकांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे.  दररोज कमीत कमी १५ मृत्यू झालेल्या रुग्णांना त्या ठिकाणी आणलं जातं.

राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात  वेगानं वाढत असलेल्या कोरोना संक्रमण लक्षात घेता  मृतांची एंटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे एका तासात कोरोना संक्रमणाबाबत माहिती मिळवता येऊ शकते. त्यानंतर लगेचच नातेवाईकांकडे मृतदेह सोपवण्यात येईल.  लवकरात लवकर त्याचे अंतिम संस्कार करण्यास मदत होईल.  २१ ऑगस्टला जारी करण्यात आलेल्या एका पत्रात या एंटीजन टेस्टच्या माध्यमातून चुकीचा रिपोर्ट येण्याच्या घटनांबबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. मृत शरीराची ऑटोप्सी केल्यानतर फॉरेंसिक विभागातील कार्मचाऱ्यांच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता होती. म्हणून आयसीएमआरच्या सल्ल्यानुसार राज्यात फॉरेंसिक ऑटोप्सी बंद करण्याच निर्णय घेण्यात आला होता. 

हे पण वाचा-

चिंताजनक! राज्यात झपाट्यानं होतोय कोरोनाचा प्रसार; आता मृतांचीही रॅपिड एंटीजन टेस्‍ट होणार

मधात दालचीनी मिसळून खाल; तर पोटाच्या विकारांसह 'या' ५ समस्यांपासून नेहमी दूर राहाल

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Noam chomsky we have little time left to decide whether human life will survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.