CoronaVirus : Maharashtra hospitals now will conduct rapid antigen test of dead bodies | चिंताजनक! राज्यात झपाट्यानं होतोय कोरोनाचा प्रसार; आता मृतांचीही रॅपिड एंटीजन टेस्‍ट होणार

चिंताजनक! राज्यात झपाट्यानं होतोय कोरोनाचा प्रसार; आता मृतांचीही रॅपिड एंटीजन टेस्‍ट होणार

देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमणानं हाहाकार निर्माण केला आहे. तर राज्यात १० लाखांपेक्षा अधिक लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे.  आतापर्यंत २९ हजार लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत आता मृतांची एंटीजन टेस्ट करण्याचा करण्याचा निर्णय सरकारने  घेतला आहे. याद्वारे रुग्णालयात दाखल होत असलेल्या प्रत्येक  मृत व्यक्तीची एंटीजन टेस्ट करून त्यावेळी ती व्यक्ती कोरोना संक्रमित होती की नाही हे पाहिलं जाणार आहे. 

सरकारने सध्या टीबीच्या चाचणीसाठीही परवागनी दिली आहे. या टेस्टद्वारे व्यक्तीला कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला होता का, हे पाहिलं जाणार आहे. चाचणीनंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल. देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे शवगृहांमध्ये जागा शिल्लक नाही. ससून सरकार रुग्णालयात एका दिवसात जवळपास ४० ते ५० लोकांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे.  दररोज कमीत कमी १५ मृत्यू झालेल्या रुग्णांना त्या ठिकाणी आणलं जातं.

राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात  वेगानं वाढत असलेल्या कोरोना संक्रमण लक्षात घेता  मृतांची एंटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे एका तासात कोरोना संक्रमणाबाबत माहिती मिळवता येऊ शकते. त्यानंतर लगेचच नातेवाईकांकडे मृतदेह सोपवण्यात येईल.  लवकरात लवकर त्याचे अंतिम संस्कार करण्यास मदत होईल.  २१ ऑगस्टला जारी करण्यात आलेल्या एका पत्रात या एंटीजन टेस्टच्या माध्यमातून चुकीचा रिपोर्ट येण्याच्या घटनांबबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. मृत शरीराची ऑटोप्सी केल्यानतर फॉरेंसिक विभागातील कार्मचाऱ्यांच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता होती. म्हणून आयसीएमआरच्या सल्ल्यानुसार राज्यात फॉरेंसिक ऑटोप्सी बंद करण्याच निर्णय घेण्यात आला होता. 

 कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

देशात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर वाढत आहे. दरम्यान आता कोरोनामुळे बिघडत असलेली परिस्थिती नियंत्रणांत आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पोस्ट कोविड-१९ मॅनेजमेंट प्रोटोकॉल जारी केले आहेत. या प्रोटोकॉलमध्ये रुग्णाच्या रिकव्हरी आणि सामुहिक स्तरावर विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहे. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही खास सल्लेही देण्यात आले आहेत.

घरात क्वारंटिन राहून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांसाठी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या या प्रोटोकॉलमधून काही महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आलेल्या आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा रुग्णांनी मास्क, हातांची स्वच्छता आणि रेस्पिरेटरी हायजीनची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे गांभीर्याने पालन केले पाहिजे. तसेच योग्य प्रणाणात गरम पाण्याचे प्राशन केले पाहिजे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या औषधांचे सेवक करावे. तसेच प्रकृती साथ देत असेल तर घरगुती काम केले पाहिजे. तसेच ऑफिसचं कामही हळूहळू सुरू करा. यादरम्यान, लोकांनी हलका व्यायाम करावा, असा सल्लाही देण्यात आला आहे.

याशिवाय प्रकृतीची काळजी घेताना रोज योगासने, प्राणायाम आणि मेडिटेशन करावे. तसेच श्वसनाचे व्यायाम करण्याचा सल्लाही देण्यात आले आहे. त्याबरोबरच शारीरिक क्षमतेनुसार रोज मॉर्निंग वॉक आणि इ्व्हिनिंग वॉक करावा. आपल्या पौष्टिक आहाराला बॅलन्स करावे. ताजे, शिजलेले आणि नरम भोजन सहज पचू शकते. तसेच पुरेशी झोप आणि आराम यांचीही विशेष काळजी घ्यावी, मद्यपान आणि धुम्रपान करू नये. घरात राहून आपल्या आरोग्याचे चांगल्या पद्धतीने निरीक्षण करावे शरीराचे तापमान, रक्तदाब, ब्लड शुगर (मधुमेह असल्यास) आणि पल्स ऑक्सिमेट्रीची माहिती ठेवा.

हे पण वाचा-

घसा खवखवल्यास कोरोनाची भीती न ठेवता; 'हे' घरगुती उपाय वापरून झटपट मिळवा आराम

चिंताजनक! २०२४ पर्यंत सगळ्यांपर्यंत कोरोनाची लस पोहोचणं अशक्य; सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांची माहिती

CoronaVirus : कोरोनाच्या उद्रेकात रशिया 'या' देशाला सर्वात आधी ५ कोटी लसीचे डोस पुरवणार  
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus : Maharashtra hospitals now will conduct rapid antigen test of dead bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.