सकस आहार, पुरेशी झोप अन् व्यायाम म्हणजे निरोगी आयुष्याचा त्रिकोण! आजार असे होतील दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:22 IST2024-07-22T16:14:45+5:302024-07-22T16:22:41+5:30
दैनंदिन कामाच्या ताणतणावामुळे हमखास आपले आरोग्याकडे दूर्लक्ष होते.

सकस आहार, पुरेशी झोप अन् व्यायाम म्हणजे निरोगी आयुष्याचा त्रिकोण! आजार असे होतील दूर
Health tips : व्यायामाचा फायदा शरीरातील प्रत्येक अवयवाला होतो. तुमचा मूड उत्तम राहतो. वजन नियंत्रणात राहते तसेच झोप व्यवस्थित लागते. निरोगी आयुष्यासाठी हे घटक एकमेकांशी संलग्न आहेत. त्यांचे महत्व आपल्याला वेळीच समजणे गरजेचे आहे.
दैनंदिन कामाच्या ताणतणावामुळे हमखास आपले आरोग्याकडे दूर्लक्ष होते. जर एखाद्या दिवशी तुम्हाला पुरेश्या प्रमाणात झोप मिळाली नाही तर त्याच्या परिणाम दुसऱ्या दिवशी तुमच्या कामावर दिसून येतो. त्यासाठी प्रत्येकाने निरोगी आरोग्याचा त्रिकोण अंगिकारला पाहिजे, असं हेल्थ एक्सपर्ट सांगतात.
निरोगी आयुष्याचा त्रिकोण रेखाटायचा असेल तर त्या त्रिकोणात व्यायाम, सकस आहार आणि पुरेशी झोप या तीन घटकांचा आवर्जून समावेश करावा लागेल. कारण या त्रिकोणातील प्रत्येक कोन हा एकमेकांशी संलग्न आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
चांगली डाएट आणि पाण्याचे प्रमाण यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. शिवाय व्यायामामुळे शरीर सक्रिय राहते. तर झोप पूर्ण न झाल्यामुळे त्याचाही आपल्या मानसिक आरोग्यावर नकळतपणे परिणाम होताना दिसतो. बहुतांश वेळा आपण स्वत: ची जितकी काळजी घेणं गरजेचे आहे तितकी घेत नाही, हे सत्य आहे.
आपली सकाळची सुरूवात जरी उत्तम व्यायामाने झाली तरी जसा दिवस पुढे सरकतो आणि आपण नेहमीच्या कामाला लागतो. त्यानंतर योग्य पद्धतीने डाएट सांभाळणे हे आपल्यासमोर आव्हान आहे. बऱ्याचदा काही लोक भूक लागल्यावर आरोग्यदायी खाणे खाण्याऐवजी पटकन मिळणारे काही खातात. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे पोषणमुल्य देणारे पदार्थ मिळत नाहीत. याचा फटका शरीराला बसतो. चांगला आहार आणि व्यायाम यामुळे शरीराला फायदा होतोच पण कामाच्या वाढत्या ओझ्यामुळे कुठेतरी झोपमोड होते आणि गणित बिघडते. असे केल्याने त्याचे आरोग्यावर विपरीत परिमाण होतात.
या त्रिकोणातील सकस आहार हा सर्वात महत्वाचा घटक आहे. ज्याकडे कायमच दूर्लक्ष केले जाते. पण एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे, शरीराला पोषणमूल्य देणारा आहार आणि पुरेश्या पाण्याचे प्रमाण सेवन हे नितांत गरजेचे आहे. हाच निरोगी आयुष्याचा त्रिकोण आहे.