सफरचंद खाण्याचीही असते योग्य वेळ! या वेळेत खाल्ल्यास गंभीर रोग आसपास फिरकणारही नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 05:45 PM2021-11-19T17:45:18+5:302021-11-19T17:55:31+5:30

आज आम्ही तुमच्यासाठी सफरचंदाचे फायदे घेऊन आलो आहोत. विशेष म्हणजे हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक सेवन केले जाणारे फळ आहे. त्याच्या उत्कृष्ट गुणधर्मांमुळे, याला जादूचे फळ देखील म्हटले जाते.

health benefits of apple know the right time to eat apple | सफरचंद खाण्याचीही असते योग्य वेळ! या वेळेत खाल्ल्यास गंभीर रोग आसपास फिरकणारही नाहीत

सफरचंद खाण्याचीही असते योग्य वेळ! या वेळेत खाल्ल्यास गंभीर रोग आसपास फिरकणारही नाहीत

googlenewsNext

सफरचंद हे असेच एक फळ आहे, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच कारणामुळे आज आम्ही तुमच्यासाठी सफरचंदाचे फायदे घेऊन आलो आहोत. विशेष म्हणजे हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक सेवन केले जाणारे फळ आहे. त्याच्या उत्कृष्ट गुणधर्मांमुळे, याला जादूचे फळ देखील म्हटले जाते. त्यात पुरेशा प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि रोगांशी लढणारे घटक असतात.

सफरचंद खाण्याचे फायदे
आरोग्य तज्ज्ञ डॉ रंजना सिंह यांनी झी न्युजला दिलेल्या माहितीच्या मते, सफरचंदातही असे काही घटक आढळतात, जे शरीरात नवीन पेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देतात. सफरचंद मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच, ते तुमच्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करू शकते.

तज्ञ काय म्हणतात
आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, सफरचंदात पेक्टिनसारखे फायदेशीर फायबर्स आढळतात. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. सफरचंदात व्हिटॅमिन सी संतुलित प्रमाणात असते. त्यासोबत लोह आणि बोरॉन देखील त्यात आढळतात. या सर्वांच्या मिश्रणाने हाडांना ताकद मिळते.

सफरचंद खाण्याचे १० आश्चर्यकारक फायदे

  • बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
  • किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी तुम्ही रोज सकाळी सफरचंदाचे सेवन करू शकता.
  • सफरचंदाच्या सेवनाने वृद्धत्वामुळे मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत होते.
  • सफरचंदात आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात.
  • सफरचंदात फायबर असते, जे तुमचे दात मजबूत ठेवण्यास मदत करते.
  • सफरचंदाचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
  • सफरचंदाच्या नियमित सेवनाने टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी होतो.
  • सफरचंद सेवन हृदयासाठी खूप चांगले आहे. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही.
  • सफरचंदाचा नियमित वापर वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो.
  • सफरचंदाचा रस रोज सकाळी सेवन केल्याने चेहऱ्यावरील पांढरे डाग कमी होतात.

सफरचंद खाण्याची उत्तम वेळ
आहार तज्ञ डॉ रंजना सिंह यांच्या मते सफरचंद कधीही खाऊ शकतो. सकाळी सफरचंदाचे सेवन केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. याचे कारण म्हणजे सफरचंदात फायबर आणि पेक्टिन मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी याचे सेवन केल्यास ते पचण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे सकाळी याचे सेवन करणे तुमच्यासाठी सर्वोत्तम वेळ असू शकते. लक्षात ठेवा की तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी उठता तेव्हा तुम्ही कधीही सफरचंद खाऊ नये.

Web Title: health benefits of apple know the right time to eat apple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.