आजारातून बरे झाल्यावरही हंटाव्हायरस पुरूषांच्या स्पर्ममध्ये ६ वर्ष जिवंत राहतो, रिसर्चमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 16:31 IST2026-05-15T16:30:39+5:302026-05-15T16:31:37+5:30
Hantavirus : वैज्ञानिकांचं असं मत आहे की, पुरूषांचे अंडकोष हंटाव्हायरससाठी एक सुरक्षित जागा बनतात. इथे इम्यून सिस्टीम सहजपणे पोहोचत नाही.

आजारातून बरे झाल्यावरही हंटाव्हायरस पुरूषांच्या स्पर्ममध्ये ६ वर्ष जिवंत राहतो, रिसर्चमधून खुलासा
Hantavirus : हंटाव्हायरसने सध्या काही देशांमध्ये चांगलाच हैदोस घातलाय. काही लोकांचे जीव सुद्धा गेले आहेत. त्यामुळे सध्या या नव्या व्हायरसबाबत काही संशोधनं समोर येत आहेत. अलीकडे करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, हंटाव्हायरस इन्फेक्शननंतरही तो पुरूषांच्या स्पर्ममध्ये तब्बल सहा वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो. त्यामुळे शारीरिक संबंधाच्या माध्यमातून इन्फेक्शन इतरांना होण्याचाही धोका राहतो.
स्वित्झर्लॅंडच्या स्पीज लेबॉरेटरीकडून हे संशोधन करण्यात आलंय. वैज्ञानिकांनी ५५ वर्षीय स्विस पुरूषाची टेस्ट केली, तो सहा वर्षांआधी दक्षिण अमेरिकेत हंटाव्हायरस्या एंड्रीज स्टेनने संक्रमित झाला होता. त्याचं रक्त, लघवी आणि श्वसनलिकेत व्हायरस असल्याची कोणतीही खूण नव्हती. पण त्याच्या स्पर्ममध्ये ७१ महिन्यानंतरही म्हणजे तब्बल सहा वर्षानंतरही व्हायरस होता. वैज्ञानिकांचं असं मत आहे की, पुरूषांचे अंडकोष व्हायरससाठी एक सुरक्षित जागा बनतात. इथे इम्यून सिस्टीम सहजपणे पोहोचत नाही. स्पर्म सेल्सना प्रजननासाठी सुरक्षा दिलेली असते. हेच कारण आहे की, व्हायरस इथे अनेक वर्ष जिवंत राहू शकतो.
इबोला आणि झिका व्हायरससारखी ही स्थिती आहे. म्हणजे हे व्हायरस सु्द्धा अंडकोषात लपून राहू शकतात. २०२१ मध्ये गिनीमध्ये इबोला व्हायरस काही प्रमाणात पसरला होता. २०१४-१६ मधील मोठ्या महामारीतून वाचलेल्या व्यक्तीच्या लैंगिक संबंधाद्वारे हा व्हायरस पसरला होता. या व्यक्तीच्या स्पर्ममध्ये इबोला व्हायरस अनेक वर्ष जिवंत होता.
हंटाव्हायरसची लागण कुणाला लैंगिक संबंधातून झाली अशी सध्यातरी एकही केस समोर आली नाही. पण संशोधन सांगतं की, एंडीज व्हायरसमध्ये ही शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घेतली पाहिजे.
अंडकोषात कसा जिवंत राहतो व्हायरस?
पुरूषांच्या अंडकोषात स्पर्म तयार होतात. शरीराची रचना अशी असते की, इम्यून सिस्टीम स्पर्म सेल्सवर हल्ला करत नाही. कारण असं झालं तर प्रजनन क्षमता थांबेल. हीच सुरक्षा व्हायरसना सुद्धा मिळते. ते स्पर्ममध्ये लपून राहून अनेक वर्ष जिवंत राहू शकतात. जेव्हा कुणी शारीरिक संबंध ठेवतील तेव्हा व्हायरसची लागण इतरांना होऊ शकते.
कसा पसरतो हंटाव्हायरस?
डॉक्टर सांगतात की, या इन्फेक्शनचा मुख्य सोर्स मनुष्य नाहीत, तर उंदीर आहेत. जेव्हा इन्फेक्शन झालेले उंदीर बंद जागेत किंवा कमी हवा असलेल्या जागेत जसे की, जुने शेड, स्टोर रूम किंवा टेंटमध्ये आपलं मलमूत्र किंवा लाळ सोडतात तेव्हा व्हायरस हवेच्या बारीक कणांमध्ये मिसळतो. जेव्हा एखादी व्यक्ती त्या जागेवर श्वास घेतो, तेव्हा त्याला याची लागण होतं.
बचावाचे उपाय
- हंटाव्हायरसपासून सुरक्षित राहणं फार सोपं आहे. आपलं घर आणि किचनला उंदरांपासून दूर ठेवा.
- उंदरांची घाण स्वच्छ करण्यासाठी कोरडा झाडू किंवा व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करू नका, कारण यानी व्हायरस हवेत उडतो.
- नेहमीच हँड ग्लव्ह्स आणि मास्क वापरा. घाणीवर केमिकल स्प्रे करा आणि ओल्या कापडाने स्वच्छता करा.
- व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल आणि शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर प्रोटेक्शनचा वापर करा