जाणून तर घ्या कोणत्या फळां आणि भाज्यांमध्ये काय दडलेले आहे, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 10:05 PM2021-06-20T22:05:58+5:302021-06-20T22:06:52+5:30

फळे आणि भाज्यां मधून आवश्यक पौष्टिक घटक मिळतात.या मुळे शरीराचे रक्षण धोकादायक आजारांपासून होते. प्रत्येक फळ आणि भाज्यांमध्ये वेगवेगळे पोषक घटक असतात. बऱ्याच वेळा काही लोक त्यामधील पोषक घटकांची माहिती नसल्याने त्याचे योग्य प्रकारे सेवन करत नाहीत.

Find out what is hidden in which fruits and vegetables, boost the immune system ... | जाणून तर घ्या कोणत्या फळां आणि भाज्यांमध्ये काय दडलेले आहे, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती...

जाणून तर घ्या कोणत्या फळां आणि भाज्यांमध्ये काय दडलेले आहे, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती...

Next

कोरोना कालावधीचा उद्रेक खूप मोठा आहे. अशा परिस्थितीत अधिकाधिक फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कारण रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास आपण लवकरच कोरोनाला बळी पडू शकता. फळे आणि भाज्यां मधून आवश्यक पौष्टिक घटक मिळतात.या मुळे शरीराचे रक्षण धोकादायक आजारांपासून होते. प्रत्येक फळ आणि भाज्यांमध्ये वेगवेगळे पोषक घटक असतात. बऱ्याच वेळा काही लोक त्यामधील पोषक घटकांची माहिती नसल्याने त्याचे योग्य प्रकारे सेवन करत नाहीत. चला तर मग माहिती घेऊ या कोणती फळ आणि भाज्या खाव्यात.

व्हिटॅमिन ए - त्वचा,डोळे,आणि शरीराच्या विकासासाठी व्हिटॅमिन ए महत्वाचे आहे. व्हिटॅमिन ए च्या सेवन केल्याने डोळ्यांचे आजारही दूर होतात. आपल्याला गाजर, सोयाबीन, बीट, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या, आंबा, पपई मध्ये मुबलक प्रमाणात आढळतात.

व्हिटॅमिन बी -व्हिटॅमिन बी मध्ये रायबोफ्लोबीन, निकोटिनिक एसिड, फॉलिक एसिड ,व्हिटॅमिन बी-12.याच्या कमतरतेमुळे वजन कमी होणं,भूक न लागणे,बेरीबेरी सारखे त्रास उदभवतात.याची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण पान कोबी,पातीचा कांदा,गाजर,सॅलड,संत्री,लिंबू आवर्जून खावे.

व्हिटॅमिन सी- व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास किरकोळ आजार होऊ लागतात. जसे दाताचे दुखणे, हिरड्यातून रक्त येणे, स्कर्व्हीचा आजार ,रोग प्रतिकारक शक्ती कमी होणं, व्हिटॅमिन सी अनेक फळात आणि भाज्यांत आढळत. फळांमध्ये संत्री,मोसंबी, द्राक्ष यामध्ये व्हिटॅमिन सी आढळतं. तर भाज्यांमध्ये अंकुरलेले मूग, चणा, हिरवी आणि लाल मिरची, पालक, मोहरीची भाजी, बटाटे, टोमॅटो, लिंबू इत्यादीं मध्ये आढळते.

व्हिटॅमिन डी -- व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे नैराश्य, हाडांचा कमकुवतपणा, झोपेची कमतरता निर्माण होते. व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास, सूर्यप्रकाश घेण्याचा सल्ला दिला जातो. यासह व्हिटॅमिन डी समृद्ध फळे आणि भाज्यांचे ही सेवन केले पाहिजे. एक कप संत्र्याचे ज्यूस प्यायल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण होते .संत्र्याचे ज्यूस हे हाडांना बळकट करत. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटेशियमही मुबलक प्रमाणत असते. तसेच दूध, मशरूम देखील व्हिटॅमिन डी ची कमतरता भरुन काढण्यास मदत करतात.

कॅल्शियम- कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे आणि दात कमकुवत होतात. अशा परिस्थितीत पालक, दूध, गूळ, मटार, शेंगदाणे ,शिंगाडा, सूर्यफुलाच्या बिया, संत्री, दलिया, लवंग, काळीमिरी, आंबा, जायफळ, नाचणी, बाजरी, आवळा या गोष्टींचे सेवन केल्याने कॅल्शियमची कमतरता भरुन निघते.

कार्बोहायड्रेट- यामुळे शरीरात पुरेशा प्रमाणात कॅलरी आणि उर्जा मिळते. मटार, केळी, रताळे ,बटाटे इत्यादींम कार्बोहायड्रेट असतात.

प्रोटीन- आपल्या शरीरात १८ ते २० टक्के प्रोटीन असणे आवश्यक असते. याच्या कमतरतेमुळे स्नायूत वेदना होणे, रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे, अशक्तपणा जाणवणे, केस आणि नखांवर परिणाम होणे इत्यादी लक्षणे दिसतात. प्रोटीन पेरू, हरभरे , वाटाणे, मूग, सोयाबीन, शेंगदाणे, आलुबुखार, गावरान चणा, राजमा, फ्लॉवर किंवा कोबी ,शेवगाच्या शेंगा यामध्ये प्रामुख्याने आढळतं.


 

Web Title: Find out what is hidden in which fruits and vegetables, boost the immune system ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.