Epidemiologist says us is nearing herd immunity covid infections drop 77 percent | चिंताजनक! आणखी २ महिने कोरोनाच्या लाटेचा धोका कायम; तज्ज्ञांनी सांगितलं कोरोना कधी होणार नष्ट

चिंताजनक! आणखी २ महिने कोरोनाच्या लाटेचा धोका कायम; तज्ज्ञांनी सांगितलं कोरोना कधी होणार नष्ट

दिवसेंदिवस कोरोनाच्या प्रसारात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.  कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारतासह जगभरातील अनेक  देशांमध्ये कठोर पाऊलं उचलली जात आहेत.  जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. मार्टी मेकरी आणि अलाबामा युनिव्हर्सिटीतील माहामारी रोग तज्ञ सुडेनु जुड यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत हर्ड इम्यूनिटी वेगानं वाढत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या लेखात प्राध्यापक मेकरी यांनी सांगितले की, ''एप्रिलपर्यंत म्हणजेच २ महिने १० दिवसात ही माहामारी नष्ट होऊ शकते. मोठ्या संख्येने लोकांना लस दिली जात आहे. यापुढेही लस दिली जाणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये हर्ड इम्यूनिटी तयार झाल्यानं कोरोनाचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल.''

याहू फायनांसच्या एका रिपोर्टनुसार अलाबामा युनिव्हर्सिटीतील  महामारी रोग तज्त्र सुजेन जूड यांनी सांगितले की, ''अमेरिकेत वेगानं हर्ड इम्यूनिटी तयार होणं शक्य आहे. अमेरिकेत मागच्या आठवड्यात संक्रमणाच्या केसेसमध्ये जवळपास ७७ टक्के घट झालेली पाहायला मिळाली. ''

Corona

दरम्यान अमेरिकेची प्रमुख आरोग्य संस्था सीडीसीनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एक कोटी ७९ लाख अमेरिकन नागरिकांना लस देण्यात आली  आहे. सुजने जुड यांनी सांगितले की, ''लक्षणं  नसलेले लोक मोठ्या संख्येने संक्रमित झाले आहेत. पुढच्या काही महिन्यात हर्ड इम्यूनिटी तयार होण्याची बातमी कानावर पडू शकते.'' कोरोनाच्या समस्येला नष्ट करणं अधिक सोपं; भविष्यातील संकटांबाबत बिल गेट्स म्हणाले की....

अमेरिकेत एप्रिलपर्यंत हर्ड इम्यूनिटीची स्थिती तयार होऊ शकते. या दाव्याबाबत बोलताना जॉन्स हॉपकिन्स  युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक डॉ. मार्टी मेकरी यांनी सांगितले की, ''अनेक वैद्यकिय तज्ज्ञ त्यांच्या दाव्याचे समर्थन करत आहेत. पण सार्वजनिकदृष्या या विषयावर चर्चा केल्यास लोक निष्काळजीपणा करू शकतात. त्यामुळे लस घेत असलेल्यांची संख्या कमी होऊ शकते. म्हणून वैज्ञानिकांनी सत्य लपवू नये.''CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी आली समोर

दरम्यान देशामध्ये सध्या १०९७७३८७ कोरोना रुग्ण असून त्यातील १०६७८०४८  जण बरे झाले आहेत. शनिवारी कोरोनामुळे १०१ जण मरण पावले आहेत. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १४३१२७ आहे. देशातील कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या दीड लाखापेक्षा कमी असून त्यांचे प्रमाण १.२७ टक्के आहे.  या आजारातून १ कोटी ६ लाख ७८ हजार जण बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Epidemiologist says us is nearing herd immunity covid infections drop 77 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.