जास्त खाणं सोडाल तरच कोविड 19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा टळेल धोका, 'या' देशातील आरोग्यमंत्र्यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 06:48 PM2020-07-27T18:48:51+5:302020-07-27T19:48:56+5:30

CoronaVirus News & Latest Updates जगभरातील आकड्यांचा अभ्यास केलल्यास निदर्शनास येतं की कोरोनामुळे होत असलेल्या मृतांच्या संख्येत लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांचे प्रमाण जास्त आहे.

Eat less to reduce covid 19 death risk health minister urges to people in britain | जास्त खाणं सोडाल तरच कोविड 19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा टळेल धोका, 'या' देशातील आरोग्यमंत्र्यांचा सल्ला

जास्त खाणं सोडाल तरच कोविड 19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा टळेल धोका, 'या' देशातील आरोग्यमंत्र्यांचा सल्ला

Next

कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा सगळ्यात जास्त परिणाम तीन प्रकारच्या लोकांवर जास्त होतो. रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्यांनी, आधी कोणत्याही आजाराने ग्रासलेल्या,  लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.  कारण जगभरातील आकड्यांचा अभ्यास केलल्यास निदर्शनास येतं की कोरोनामुळे होत असलेल्या मृतांच्या संख्येत लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ब्रिटनचे आरोग्य मंत्री हेलेन वाटली यांनी सोमवारी याबाबत आवाहन केले आहे.

हेलेन वाटली यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने मृत्यूचा धोका दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहे. त्याासाठी लोकांनी प्रमाणापेक्षा जास्त खाणं टाळायला हवं तसंच स्वत:चं वजन नियंत्रणात ठेवायला हवं, ४० पेक्षा जास्त बीएमआय असल्यास कोविड १९ मुळे मृत्यूचा  धोका वाढतो.  दरम्यान ब्रिटनमध्ये लठ्ठपणाशी संबंधित समस्या कमी करण्याासाठी सरकारने जंक फूडच्या जाहिरातांवर बंदी  घातली आहे.

कोरोना से जान बचाने के लिए ब्रिटेन ने दी खान-पान से जुड़ी ये नसीहत

हाय फॅट, हाय शुगर आणि जास्त मीठ असलेल्या पदार्थांच्या  जाहिरातींना टेलिव्हिजन आणि ऑनलाईन माध्यामांमध्ये बॅन करण्यात आलं आहे. याशिवाय काही पदार्थावर एकावर एक फ्री देण्याची पध्दत सुद्धा सरकारकडून बंद करण्यात येणार आहे. काही दुकानं आणि  हॉटेल्समध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूंवर कॅलरी लेबल लावण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

ब्रिटनचे पंतप्रधान बेरिस जॉनसॉन यांनी कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकल्यानंतर स्वतःचं वजन ६ किलोंनी कमी केलं आहे. सुरूवातीपासूनच ओव्हरवेट लोकांसाठी कोरोना विषाणू जीवघेणा ठरू शकतो अशी माहिती तज्ज्ञांनी दिली होती. संपूर्ण जगभरातील १ कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येत ब्रिटनचा क्रमांक पहिल्या पाच देशांमध्ये आहे. याशिवाय अमेरिका, ब्राझिल आणि भारतात कोरोना विषाणूंचे संक्रमण वाढत आहे. 

कोरोनाच्या भीतीने घरात राहणाऱ्या लोकांमध्ये कोरोना संक्रमणाचं प्रमाण जास्त; संशोधनातून खुलासा

CoronaVirus News : दिलासादायक! महाराष्ट्रातील 'या' शहरांत सगळ्यात आधी दिली जाणार कोविड 19 ची लस

Web Title: Eat less to reduce covid 19 death risk health minister urges to people in britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.