हृदयाला (Heart) शरीराचे इंजिन म्हटले जाते. ज्या प्रमाणे गाडी इंजिनाशिवाय चालू शकत नाही, त्याच प्रमाणे शरीर सुद्धा हृदयाशिवाय चालू शकत नाही. म्हणूनच गाडीचे इंजिन जसे आपण निरोगी राखतो, त्याची काळजी घेतो, तशीच काळजी शरीराचे इंजिन असणाऱ्या हृदयाची पण घ्यायला हवी. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात तर आहार (diet) आणि जीवनशैली (lifestyle) दोन्हींची ऐशीतैशी झाली आहे. त्यामुळे खास करून हृदयावर ताण येऊन हृदय रोगांचे (heart disease) प्रमाण वाढत चालले आहे. याला अजून एक कारण आहे ते म्हणजे चुकीचा आहार! त्यामुळे जाणून घ्या कसा असावा हृदयाचे आरोग्य (health) जपण्यासाठीचा योग्य आहार.
ओट्स आणि बार्ले (oats and barley)ओट्स आणि बार्ले हे आधुनिक युगातील सर्वोच्च पौष्टिक खाद्यपदार्थांपैकी आहे आहेत. ज्यांच्या सेवनाने शरीराच्या आत एक जेल फॉर्मचे लिक्विड तयार होते. हे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करते आणि आपले पोट जास्त काळ भरलेले राहते. जाणकारांच्या सल्ल्यानुसार दिवसातून किमान 3 ग्राम बीटा ग्लुकन खाल्ले पाहिजे. बीटा ग्लूकन एक सॉल्यूबल फाइबर आहे. हे फायबर ओट्स आणि बार्ले दोन्हीत आढळते आणि म्हणून कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी ओट्स आणि बार्ले खाण्याचा सल्ला दिला जातो.
अॅव्होकॅडो (avocado) अॅव्होकॅडो शरीरासाठी अतिशय उपयुक्त फळ आहे. हे फळ शुगर असणाऱ्या रूग्णांसाठी तर अमृता समान आहे. शिवाय लिव्हरच्या समस्यांपासून सुद्धा आपला बचाव करते. पण सगळ्यात जास्त हे प्रभावी ठरते हृद्याला निरोगी राखण्यासाठी! अॅव्होकॅडोमध्ये मोनोसेच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि इतर आवश्यक पोषक तत्वे आढळतात. अॅव्होकॅडो आपल्या शरीराला पोषण देण्यासोबतच कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यास सुद्धा हातभार लावतो. तुम्ही हे फळ सलाडच्या रुपात सुद्धा खाऊ शकता.
कडधान्य (pulses)कडधान्य सुद्धा हृदयाला स्वस्त राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. राजमा, उडद डाळ, चणे, हिरवे वाटणे आणि अशी कित्येक कडधान्ये फायबरचा अतिशय संपन्न स्त्रोत असतात. पचन यंत्रणेला यांचे पचन करण्यासाठी खूप वेळ सुद्धा लागतो. त्यामुळेच यांच्या सेवनाने पोट जास्त काळ भरलेले राहते आणि सारखी भूक लागत नाही. ही कडधान्ये कोलेस्ट्रॉलचा स्तर सुद्धा नियंत्रित ठेवतात. म्हणून तज्ञ सल्ला देतात की आहारात एक तरी कडधान्य असलेच पाहिजे. तर मंडळी जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी राखायचे असेल आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर संतुलित ठेवून कोणत्याही गंभीर आजाराला बळी पडायचे नसेल तर आवर्जून या प्रकारच्या पदार्थांचा आहारात समावेश करा आणि सुदृढ राहा.