The doctor claims the coronavirus is causing blood clotting leading to death | 'या' कारणामुळे कोरोना रुग्णांचा अचानक मृत्यू होतो; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा

'या' कारणामुळे कोरोना रुग्णांचा अचानक मृत्यू होतो; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा

चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूनं संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसवर डॉक्टर आणि तज्ज्ञ गेल्या काही महिन्यांपासून संशोधन करत आहेत. जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसनं लाखो लोकांचा बळी घेतला आहे. अलिकडे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने होत असलेल्या मृत्यूंबाबत मोठा खुलासा तज्ज्ञांनी केला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना विषाणूंचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. रक्त जास्त प्रमाणात गोठल्यानं रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. हा दावा कोविड थिंक टँकचे सदस्य आणि लखनऊतील  केजीएमयू रुग्णालयातील पलमोनरी आणि क्रिटीकल केअर मेडीसिनचे विभागाध्यक्ष डॉक्टर वेद प्रकाश यांनी केला आहे. 

डॉक्टर वेद प्रकाश यांनी सांगितले की कोरोना व्हायरसमुळे फुफ्फुसांच्या नसांमध्ये ब्लड क्लॉटिंगची स्थिती उद्भवते. ब्लड क्लॉटींग झाल्यास ऑक्सिजन मिळण्याचे सगळेच रस्ते बंद होतात. त्यामुळे कोरोना रुग्णांचा अचानक मृत्यू होतो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार इतर आजारांच्या तुलनेत कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने ब्लड क्लॉटिंगची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहे. अजूनही या विषयावर तज्ज्ञांचा रिसर्च सुरू आहे. जगभरात कोरोना व्हायरसमुळे ब्लड क्लॉट होऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 

कोरोना वायरस से अचानक हो जा रही मौत, डॉक्टरों ने बताई वजह

डॉक्टर वेद प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर क्लोटींगची तपासणी करण्यासाठी डी डायमर्स तपासणी केली जाते. डी डायमर्सची लेव्हल वाढली असेल तर उपचारांसाठी प्रोटोकॉल फॉलो केले जातात. रक्ताच्या गुठळ्या झाल्यानंतर रक्त पातळ करण्याची औषधं दिली जातात. 
या औषधानं शरीरात जमा झालेल्या रक्ताला पातळ करता येऊ शकतं. एक्स रे, सीटी स्कॅनद्वारे क्रुड एनालिसिस करून शरीरात रक्त किती प्रमाणात गोठलं आहे. याचा अंदाज लावला जातो.

रक्त गोठण्याव्यतिरिक्त पलमोनरी हायपरटेंशन आणि राईट फेलियरचीही माहिती मिळवता येऊ शकते. याबाबत योग्य तपासणी ऑटोप्सीद्वारे केली जाते. ऑटोप्सीद्वारे मृत शरीरातील अवयव काढून योग्य तपासणी केली जाते. याद्वारे रुग्णाचा मृत्यू रक्त गोठल्यामुळे झाला आहे की इतर कारणांमुळे याबाबत माहिती मिळवता येऊ शकते. 

हे पण वाचा-

खुशखबर! भारतातील सर्वात स्वस्त कोरोनाचं औषध Zydus Cadila कंपनीकडून लॉन्च; वाचा किंमत

स्वयंपाकघरातील 'या' ५ पदार्थांच्या सेवनानं फुफ्फुसांना आजारांपासून ठेवा दूर

सर्दी, खोकल्यावर रामबाण उपाय १ ग्लास तुळशीचं दूध; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The doctor claims the coronavirus is causing blood clotting leading to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.