5 food in your kithcen makes your lungs healthy | स्वयंपाकघरातील 'या' ५ पदार्थांच्या सेवनानं फुफ्फुसांना आजारांपासून ठेवा दूर

स्वयंपाकघरातील 'या' ५ पदार्थांच्या सेवनानं फुफ्फुसांना आजारांपासून ठेवा दूर

तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेलच  जर फुफ्फुसं चांगली असतील तर तुम्ही वाढत्या वयातही निरोगी राहू शकता. फुफ्फुसं ही श्वसनप्रणालीचे केंद्र असतात. फुफ्फुसांमध्ये समस्या निर्माण झाल्यास जीवघेणं ठरू शकतं.  त्यासाठी सुरूवातीपासूनच काळजी  घेणं गरजेचं आहे. क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज (COPD), क्रॉनिक ब्रोंकाइटिस, निमोनिया, अस्थमा, टीबी, लंग्‍स कॅन्सर इतर अनेक आजार फुफ्फुसांमध्ये बिघाड झाल्यानंतर  उद्भवू शकतात. स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही या आजारांपासून लांब राहू शकता. आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील अशा पदार्थांबाबत सांगणार  आहोत अशा पदार्थांचे सेवन करून तुम्ही फुफ्फुसांना निरोगी ठेवू शकता. 

आलं

आल्याचा काढा सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखीवर फायदेशीर ठरतो. यात काळ्या तुळशीची पानं, सुंठ पावडर वा किसलेले आले, जेष्ठमध, भाजून कुटलेली अळशी (जवस) चहाच्या पातीचे तुकडे, घालून पाणी अर्धे आटेपर्यंत उकळावे. त्यात गुळ घालून, गाळून हा काढा प्यायला द्यावा. छातीत कफ असल्यास लोखंडाच्या पळीत टाकणाखार गरम करावा व ती लाही पिण्यापूर्वी मिसळावी. फुफ्फसांमध्ये असलेली घाण बाहेर फेकण्यासाठी हा काढा उपयुक्त ठरतो. 

आळशीच्या बीया

अभ्यासातून सिद्ध झालं आहे की कॅन्सर (Cancer) जोखीम कमी करण्यासाठी आळशीचं बी अत्यंत उपयुक्त आहे. प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि फुफ्फुसांचा कॅन्सरशी लढण्यासाठी आळशीचं बी महत्त्वाचं समजलं जातं. आळशीच्या बियांमध्ये लिगननचा स्तर अधिक प्रमाणात असतो. यामध्ये कॅन्सर  पासून संरक्षण होतं. 

सफरचंद

सफरचंदात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे गुण असतात. शरीराला पुरेश्या प्रमाणात व्हिटामीन्स मिळण्यासाठी सफरचंदाचे सेवन करणं गरजेचं आहे.  ज्याच्या सेवनानं शरीरास पोषक असलेली सर्वच तत्त्वं आपल्याला मिळतात. निरोगी आरोग्यासाठी दररोज सकाळी एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. यामुळे कित्येक गंभीर आजारांपासून आपला बचाव होण्यास मदत होते.  

पनीर

ओमेगा थ्री फॅटी एसिड्स मिळणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे फुप्फुसांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते. दूध, पनीर, दही, आळशीच्या बीया या पदार्थाचे सेवन करून तुम्ही शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून काढू शकता. 

लसूण आणि कांदा

लसूण आणि कांदा हे दोन असे पदार्थ आहेत. त्यामुळे फुफ्फुसांना मजबूती येण्यास मदत मिळते. यात अनेक एँटीऑक्सीडेंट्स आणि एँटीफंगल गुण असतात. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये धुळीचे कण, किटाणू जमा होण्यापासून रोखता येते. परिणामी फुफ्फुसं सुरक्षित राहतात.

तसंच आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवानं राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुम्हाला विचार करण्यासाठी, लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि तरतरीत राहण्यासाठी मदत मिळते. त्यासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुमच्या ऊर्जेतही वाढ होत राहाते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकण्यासाठी जास्तीत जास्त पाणयाचे सेवन करणं गरजेचं आहे.

हे पण वाचा-

सर्दी, खोकल्यावर रामबाण उपाय १ ग्लास तुळशीचं दूध; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

अवघ्या जगाचे डोळे असलेल्या लसीची चाचणी अपूर्ण; तरीही उत्पादनाला सुरूवात?, वाचा WHO ची प्रतिक्रिया

'या' ६ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर; वाचा लक्षणं आणि बचावाचे उपाय

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 5 food in your kithcen makes your lungs healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.