कांदा कापून फ्रिजमध्ये ठेवत असाल तर वेळीच सावध व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 06:01 PM2018-07-28T18:01:41+5:302018-07-28T18:02:18+5:30

आपल्या जेवणामध्ये कांद्याची महत्त्वाची भूमिका असते. कांद्याशिवाय जेवण म्हणजे अशक्यच. जवळपास सर्व भारतीय पदार्थांमध्ये कांद्याचा वापर केला जातो. तसेच सलाड तयार करताना कांद्याचा वापर सर्वाधिक करण्यात येतो.

Do Not Store Chop Onions in Fridge its Harmful to Health | कांदा कापून फ्रिजमध्ये ठेवत असाल तर वेळीच सावध व्हा!

कांदा कापून फ्रिजमध्ये ठेवत असाल तर वेळीच सावध व्हा!

googlenewsNext

आपल्या जेवणामध्ये कांद्याची महत्त्वाची भूमिका असते. कांद्याशिवाय जेवण म्हणजे अशक्यच. जवळपास सर्व भारतीय पदार्थांमध्ये कांद्याचा वापर केला जातो. तसेच सलाड तयार करताना कांद्याचा वापर सर्वाधिक करण्यात येतो. कांदा कोणत्याही स्वरूपात खाल्ला तरीही शरीरासाठी फायदेशीर असतो. त्यामुळे कांद्याचा समावेश जेवणात केला जातो.

कांद्यामध्ये अनेक गुणधर्म आढळून येतात. यामध्ये असलेले औषधी  गुणधर्म, अॅन्टी-बॅक्टेरिअल गुणधर्म हृदयासाठी आणि आतड्यांसाठी फायदेशीर असतात. पण जर कांदा कापून तुम्ही फ्रिजमध्ये स्टार करत असाल तर असं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. 

कापलेला कांदा फार लवकर खराब होतो. त्यामध्ये बॅक्टेरिया लवकर वाढू लागतात आणि ऑक्सीडाइज झाल्यानंतर शरीरासाठी हानिकारक ठरतात. कापलेला कांदा फ्रिजमध्ये स्टोर केल्यानं तापमानातील फरकामुळे त्यामध्ये शरीराच्या दृष्टीने हानिकारक पदार्थ तयार होऊ लागतात. त्यामुळे जेवण तयार करताना कांदा कापा. 

एक पर्याय आहे ज्यामुळे तुम्ही कांदा फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता. त्यासाठी तुम्ही कापलेला कांदा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवू शकता. यामुळे कांद्याला पाणी सुटत नाही आणि थंड राहतो. एका संशोधनातून असे समोर आले आहे की, जर तुम्हाला कापलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवायचा असेल तर, सील बंद डब्यामध्ये ठेवू शकता. परंतु, तापमान 4.4 डिग्रीपेक्षा कमी असणं गरजेचं आहे.

तुम्ही जास्तीत जास्त हेच लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, कांदा जर तुम्ही जेवण बनवण्याआधी आणि खाण्याआधी कापला तर ते तुमच्या शरीरासाठीही फायदेशीर असतं. 

Web Title: Do Not Store Chop Onions in Fridge its Harmful to Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.