Do not Drink 'turmeric milk' at night in this case | तुम्हालाही 'या' २ समस्या असतील; तर रात्री चुकूनही करू नका हळदीच्या दुधाचं सेवन

तुम्हालाही 'या' २ समस्या असतील; तर रात्री चुकूनही करू नका हळदीच्या दुधाचं सेवन

हळदीत आणि दूधात  रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे गुण असतात. अनेक पोषक घटक असल्यामुळे हळदीच्या दूधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यातील एंटीवायरल आणि एंटीबॅक्टेरिअल गुणांमुळे आजाराशी सामना करण्यास मदत होते. हळदीच्या दुधाला सुपर ड्रिंक असंही म्हटलं जातं.  काही स्थितीत हळदीच्या दुधाचं सेवन करणं आरोग्यावर नकारात्मक परिणाम करणारं ठरू शकतं. कोणत्यावेळी  हळदीच्या दुधाचं सेवन करू नये याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

कफ बाहेर येत नसतील तर हळदीच्या दुधाचं सेवन करू नये

अनेकांना छातीत कफ जमा होण्याची समस्या उद्भवते. शरीरातील कफ बाहेर पडत नसतील तर अशा स्थितीत हळदीच्या दुधाचं सेवन करू नये. हळदीचं दूध प्यायाल्यानं कफ छातीत जमा राहतो. हळदीमुळे कफ सुकतात. तरीही तुम्हाला प्यावसं वाटत असेल तर गरम दूधात हळदीची पावडर घालून मग त्यांचे सेवन करा. 

श्वास घ्यायला त्रास होत असेल 

श्वास घ्यायला त्रास होत असेल तर रात्री झोपताना हळदीच्या दूधाचे सेवन करू नये. हळदीतल्या गुणधर्मांमुळे श्वसनप्रणाली अतिसक्रिय होऊन श्वास घेण्यासाठी होत असलेला त्रास वाढण्याची शक्यता असते.  म्हणून तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा पंपाचा वापर करत असाल तर हळदीच्या दुधाचं सेवन करू नका. कोणत्याही व्यक्तीसाठी हळदीचे सेवन २० ते ४० mg पुरेसं असतं. जास्त प्रमाणात घेतल्यास शरीराला गरम पडण्याची शक्यता असते. 

तयार करण्याची योग्य पद्धत

जास्तीत जास्त लोक कुटलेली हळद दूधामध्ये एकत्र करून त्याचं सेवन करतात. दरम्यान, हळदीच्या पावडर ऐवजी हळकुंड जास्त इफेक्टिव्ह असतं. तुम्ही एखादं हळकुंड घेऊन ते वाटून घ्या. त्याचबरोबर काळी मिरीची पावडर करून एकत्र करा. आता एक कप दूध एकत्र करून त्यामध्ये कुटलेली हळद आणि मिरी पावडर एकत्र करा. 20 मिनिटांपर्यंत उकळल्यानंतर गाळून घ्या त्यामध्ये एक चमचा मध एकत्र करून प्या. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

हे पण वाचा-

खुशखबर! भारतातील सर्वात स्वस्त कोरोनाचं औषध Zydus Cadila कंपनीकडून लॉन्च; वाचा किंमत

स्वयंपाकघरातील 'या' ५ पदार्थांच्या सेवनानं फुफ्फुसांना आजारांपासून ठेवा दूर

सर्दी, खोकल्यावर रामबाण उपाय १ ग्लास तुळशीचं दूध; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Do not Drink 'turmeric milk' at night in this case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.