शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

Diabetes Risk : अलर्ट! 'या' ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये जास्त असतो डायबिटीसचा धोका; संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 12:03 IST

Blood groups run a higher risk of diabetes : जर तुम्ही प्रीडायबेटिक असाल तर जीवनशैलीत बदल करून तुम्ही टाईप २ डायबिटीज  होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

डायबिटीज एक सामान्य समस्या आहे. देशात ७० मिलियन लोक या आजारानं पीडित आहेत. भारताला जगभरातील डायबिटीसची राजधानी म्हटलं जात आहे.  खाण्यापिणंआणि लाईफस्टाईलशी निगडीत हा आजार आहे. हा आजार नियंत्रणात  ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशनं (सीडीसी) दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही प्रीडायबेटिक असाल तर जीवनशैलीत बदल करून तुम्ही टाईप २ डायबिटीज  होण्याचा धोका कमी होऊ शकतो. खराब जीवनशैली व्यतिरिक्त अन्य काही कारणांमुळे या आजाराचा धोका वाढतो. 

नॉन-O ब्लड टाइपचे लोक होऊ शकतात डायबिटिसचे शिकार

युरोपियन असोसिएशनच्या डायबेटोलोजिया या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या 2019 च्या अभ्यासानुसार, O-ब्लड ग्रुप असलेल्या लोकांच्या  तुलनेत नॉन-O ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना टाइप 2 डायबिटीस होण्याचा धोका जास्त असतो. 

अभ्यास काय सांगतो?

80,000 महिलांवर केलेल्या अभ्यासात ब्लड ग्रुप आणि टाइप 2  डायबिटीसचा धोका यांच्यातील संबंध आढळून आला. यापैकी 3553 लोकांना टाइप 2 डायबिटीस आढळून आला आणि नॉन-ओ प्रकारचा ब्लड ग्रुप असलेल्यांना डायबिटीस होण्याचा धोका जास्त होता.

बी ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये जास्त जोखिम

अभ्यासानुसार, ए ब्लड ग्रुप असणाऱ्या महिलांमध्ये ओ ब्लड ग्रुपच्या स्त्रियांपेक्षा टाइप 2 डायबिटीस होण्याची शक्यता 10 टक्के जास्त आहे. ओ ब्लड ग्रुपच्या महिलांच्या तुलनेत बी ब्लड ब्लड ग्रुपच्या महिलांमध्ये मधुमेह होण्याची शक्यता 21 टक्के जास्त आहे.दरम्यान युनिर्व्हर्सल डोनर  ओ निगेटिव्हची प्रत्येक कॉम्बिनेशनसह तुलना केल्यानंतर  बी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या महिलांमध्ये टाईप २ डायबिटिस विकसित होण्याची जोखिम जास्त असते. आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

बी रक्तगटाच्या लोकांमध्ये जास्त जोखिम का असते?

संशोधकांच्यामते डायबिटीसची जोखिम आणि रक्ताच्या गटाच्या प्रकारातील संबंध अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही. अभ्यासानुसार नॉन ओ रक्तगटातील लोकांमध्ये नॉन-वीलब्रँड फॅक्टर जास्त असतो. त्याचा संबंध साखरेच्या वाढत्या स्तराशी असतो.  संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार रक्त वेगवेगळ्या प्रकारच्या अणूंशी जोडलेले असते.  त्यामुळे डायबिटीस होण्याचा धोका वाढतो.

 तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू 

जर एखाद्या व्यक्तीस टाइप 2 डायबिटीसचा त्रास होत असेल तर, ते  शरीरात साखर नियंत्रित करण्याच्या आणि वापरण्याच्या मार्गावर परिणाम करते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, वेळेवर उपचार न केल्यास ते खूप धोकादायक ठरू शकते. म्हणून वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जीवनशैली सुधारणं योग्य पर्याय ठरेल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेहHealthआरोग्य