Ebola Virus hidden in human body : तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 11:43 AM2021-03-18T11:43:28+5:302021-03-18T11:55:48+5:30

Ebola virus was hidden in the human body : आरोग्य मंत्रालयानं संक्रमणाच्या ३ नमुन्यांना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयोगशाळेत पाठवले आहे. 

Ebola outbreaks : Ebola lingered in survivor for 5 years before new outbreak science | Ebola Virus hidden in human body : तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

Ebola Virus hidden in human body : तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

Next

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसाराता आता आणखी एका व्हायरसची प्रसार वेगानं होताना दिसून येतोय. इबोलाची  माहामारी अजूनही आफ्रिकन देशातून नष्ट झालेली नाही. २०१४ नंतर पाच वर्षांनी २०१९ पासून या व्हायरसच्या उद्रेकाला सुरूवात झाली होती. आता वैज्ञानिकांनी दिेलेल्या माहितीनुसार हा व्हायरस २०१४ ते २०१६ पर्यंत लोकांना आजारी करून मानवी शरीरात लपून निष्क्रीय झाला होता सध्या या व्हायरसच्या प्रसारासाठी अनुकूल वातावरण दिसताच व्हायरसनं हातपाय पसरवायला सुरूवात केली आहे. आता हे संक्रमण पश्चिमी आफ्रिकी देशात देशात पसरत आहे.

हा व्हायरस माणसांच्या शरीरात लपू शकतो असा अंदाज वैज्ञानिकांना आधीपासूनच होता. खासकरून ज्या लोकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असतो अशा लोकांचे डोळे, अंडकोष इत्यादी भागात हा व्हायरस घर करून राहतो. म्हणजेच संक्रमणातून बाहेर आल्यानंतरही ती व्यक्ती आजाराचा प्रसार करत असते. दुर्मिळ स्थितीत एका व्यक्तीमुळे इतर व्यक्ती संक्रमित होऊ शकतात. इबोला व्हायरसचं सगळ्यात दीर्घकालीन संक्रमण ५०० दिवसांनंतर दिसून आलं आहे.

एका नवीन विश्लेषणानुसार इबोला व्हायरस फक्त दीर्घकाळ लपूनच राहत नाही तर  संक्रमणाची तीव्रताही वाढवतो. गिनी मध्ये अलिकडेच  १८ लोक या आजारानं संक्रमित झाले आहेत.  ९ लोकांना या व्हायरसच्या संक्रमणामुळे मृत्यूचा सामना करावा लागला आहे. गिनी आरोग्य मंत्रालयानं संक्रमणाच्या ३ नमुन्यांना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयोगशाळेत पाठवले आहे. 

कोणत्याही त्रासासाठी गोळ्या घेताना करू नका ही चूक; डॉक्टरांनी सांगितली शरीरासाठी घातक ठरणारी सवय

याठिकाणी तज्ज्ञांनी नमुन्यांच्या जिनोम सिक्वेंसची माहिती मिळवली आणि पुन्हा संक्रमण पसरवत असलेल्या जीन्सच्या संक्रामक जिनोम्सची नवीन नमुन्यासह तुलना केली. त्यानंतर समोर आलं की, २०१४ मध्ये पसरलेला मकोना वेरिएंट हा मिळता  जुळता आहे. २०१४ ते १०१६ मध्ये आफ्रिकेत अशा प्रकारचे संक्रमण पसरले होते. त्यामुळेच  गिनी, लायबेरिया, सिएरा, लियोनच्या ११ लोकांचा मृत्यू झाला होता. 

दिवसाला फक्त १ केळी खाल्यानं वजन कमी होण्यासह मिळतात हे फायदे; या प्रकारचं केळं सगळ्यात जास्त गुणकारी

तज्ज्ञांनी  virological.org मध्ये प्रकाशित केलेल्या विश्लेषणात लिहीले आहे की, नवीन  वेरिएंटमध्ये जवळपास डजनभर अनुवांशिक फरक होते. हा व्हायरस सर्व अवयवांमध्ये फिरत असल्यामुळे कोणालाही संक्रमित करू शकतो. अशा प्रकारचं संक्रमण पुरूषांकडून शरीरसंबंधाच्या माध्यमातून इतरांमार्फत पोहोतचं.

Web Title: Ebola outbreaks : Ebola lingered in survivor for 5 years before new outbreak science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.