शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

Coronavirus will never leave : काळजी वाढली! आता कधीच नष्ट होणार नाही कोरोना; नेहमीच माणसांमध्ये संक्रमण राहणार; तज्ज्ञांचा दावा....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 6:50 PM

Coronavirus will never leave : इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ समीरन पांडा म्हणतात की, '' कोविड -१९ माहामारीपूर्वी व्हायरस अस्तित्वात होता आणि भविष्यातही कायम राहील. ''

संपूर्ण जगभरात  कोरोनाने हाहाकार पसरवलेला असताना कोरोनाच्या संक्रमणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. या व्हायरसवर बारकाईनं काम करत असलेल्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस आता कधीच जगातून नष्ट होणार नाही.  सजीवांच्या संपर्कात आल्यामुळे हा व्हायरस नेहमीच लोकांबरोबर राहील. जेवढं आपलं शरीर व्हायरसशी लढण्यास जास्त  बळकट होईल तेव्हढी व्हायरसची क्षमता कमी होईल. 

सजीवांच्या पेशी व्हायरससाठी महत्वपूर्ण

अमर उजालानं दिलेल्या वृत्तानुसार इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि कोरोना विषाणूचे  संशोधक समीरन पांडा म्हणतात की, '' कोविड -१९ माहामारीपूर्वी व्हायरस अस्तित्वात होता आणि भविष्यातही कायम राहील.'' डॉ. समीरन पांडा चीनच्या वुहानमध्ये पहिल्या प्रकरणात अहवाल आल्यापासून या प्राणघातक व्हायरसच्या प्रत्येक घटकावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

अरे व्वा! पुढच्या काही आठवड्यात भारताला मिळणार तिसरी कोरोना लस; भारतीय कंपनीचा दावा

''जिवंत प्राण्यांच्या संपर्कात असल्यास कोणताही विषाणू आपले अस्तित्व सोडणार नाही, कारण व्हायरस वाढविण्यासाठी प्राण्यांच्या पेशी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. म्हणूनच, आता कोरोना विषाणूचा नाश होण्याची शक्यता नाही. हा विषाणू आपल्या आणि आपल्या आजूबाजूला कायम राहील.'', असेही त्यांनी सांगितले.

९० वर्षांपूर्वीचा एंफ्लूएंजा व्हायरस आजही अस्तिवत्वात

डॉक्टर पांडा पुढे सांगतात की, ''जवळपास ९० वर्षांपूर्वीचा एन्फुएंजा व्हायरस आजही  अस्तित्वात आहे. तेव्हापासून आजपर्यंत अनेकदा व्हायरसनं रूप बदलली आहेत. त्याच प्रकारे, एका दशकापूर्वी, स्वाइन फ्लूने लोकांच्या जीवनाचा वेग थांबविण्यास सुरुवात केली. स्वाइन फ्लूच्या उपचाराचे काम जसजसे पुढे होत गेले तसतसे व्हायरसचे उत्परिवर्तनही त्याच पद्धतीने झाले.  2009 मध्ये स्वाइन फ्लूमुळे लोक घाबरुन गेले होते परंतू आता या आजाराचं प्रमाण कमी झालं आहे. लोकांमध्ये या आजाराची फारशी भीती राहिलेली नाही. स्वाईन फ्लूमध्ये आताही बदल होत आहे. येत्या काळात कोरोनाचंही स्वरूप बदलत राहील.''  

 तब्बल ३० वर्षांनंतर महिलेनं उघडलं तोंड; या एका आजारामुळे फक्त द्रव पदार्थांवर होती जीवंत

घाबरण्याची आवश्यकता नाही

कोरोना व्हायरस जीवघेणा असले तरी घाबरण्याचे काहीही कारण नाही.  डॉक्टर पांडा यांनी दिलेल्या माहितीनुसार आपली रोगप्रतिकारकशक्ती जितकी मजबूत होईल. तितकाच व्हायरसचा प्रभाव कमी होईल.  ज्या लोकांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते त्यांच्यावर व्हायरस सहजासहजी आक्रमण करू शकत नाही. सरकारकडून लसीकरणास सुरूवात झाली असून जितके जास्त लोक लस घेतील तितकाच कोरोनाचा प्रभाव कमी झालेला पाहायला मिळेल. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला