Coronavirus vaccine : अरे व्वा! पुढच्या काही आठवड्यात भारताला मिळणार तिसरी कोरोना लस; भारतीय कंपनीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 06:04 PM2021-03-29T18:04:10+5:302021-03-29T18:14:15+5:30

Coronavirus vaccine & Latest Updates : डॉ. रेड्डीज लॅबनं रशियनं कंपनीची लस स्पुटनिक व्ही तयार करण्यासाठी रशिनय  डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडासह करार केला होता. 

Coronavirus vaccine : In india dr reddy lab expects sputnik v to get approval in india in next few weeks | Coronavirus vaccine : अरे व्वा! पुढच्या काही आठवड्यात भारताला मिळणार तिसरी कोरोना लस; भारतीय कंपनीचा दावा

Coronavirus vaccine : अरे व्वा! पुढच्या काही आठवड्यात भारताला मिळणार तिसरी कोरोना लस; भारतीय कंपनीचा दावा

googlenewsNext

भारतात  लसीकरणासाठी कोरोनाच्या दोन लसींचा वापर केला जात आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. आता देशाला लवकरच कोरोनाची तिसरी लस मिळणार असल्याची चर्चा आहे. हैदराबादमधील प्रसिद्ध फार्मा कंपनी  डॉ. रेड्डीज लॅबोरेटरिजनं दिलेल्या माहितीनुसार रशियाची कोरोनाची लस 'स्पूतनिक-व्ही' ला पुढच्या काही आठवड्यात  औषध नियमक मंडळाकडून मंजूरी मिळू शकते. अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. डॉ. रेड्डीज लॅबनं रशियनं कंपनीची लस स्पुटनिक व्ही तयार करण्यासाठी रशिनय  डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडासह करार केला होता. 

रविवारी संध्याकाळी एका वेबिनारदरमम्यान डॉ. रेड्डीज लॅबचे सीईओ, एपीआई दीपक सापरा यांनी सांगितले की, ''काही आठवड्यात या लसीला मंजूरी मिळण्याची आशा  आहे. ही २ डोसची लस असणार आहे. पहिला डोस घेतल्यानंतर त्यानंतरचा डोस  २१ व्या दिवशी घेतला जाणार आहे. २८ आणि ४२ दिवस पूर्ण झाल्यानंतर रोगप्रतिकारकशक्ती विकसित होईल. ''

अलिकेडच भारतात रशियाची  कोरोना लस स्पुतनिक व्हीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. डॉ. रेड्डीज लॅबनं दिलेल्या माहितीनुसार या लसीचे आतापर्यंत  १५०० लोकांवर चाचणी करण्यात आली आहे. भारतीय औषध महानियंत्रक मंडळाकडून मंजूरी मिळाल्यानंतर डॉ. रेड्डीज लॅबनं या लसीची चाचणी सुरू केली आहे. अद्याप या लसीच्या चाचणीचा निकाल जाहीर झालेला नसला तरी पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये चाचणीचा निकाल येईल असे बोलले जात आहे. 

टाके मारल्यापासून छातीत दुखायचं; कंटाळून पुन्हा डॉक्टरकडे गेला अन् X-Ray रिपोर्टमध्ये दिसलं असं काही....

ही लस भारतात मंजूर झाल्यास कोरोना लसीकरण मोहिमेत समाविष्ट होणारी अशी तिसरी कोरोना लस असेल.कोरोना लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सध्या भारतात सुरू आहे. १६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण अभियान सुरू झाले आणि आतापर्यंत देशभरात सहा कोटी पाच लाखाहून अधिक लोकांना कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. आता ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही लस दिली जाणार आहे. 

सावधान! हृदयाच्या आजारासाठी कारणीभूत ठरतात 'या'  ५ सवयी; सर्वाधिक तरूण होताहेत शिकार

दरम्यान आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात ४० हजार ४१४ नवीन नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, १०८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३ लाख ३२ हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.९५ टक्क्यांवर आले आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता तीन लाखांवर गेली आहे. तर सध्या ३ लाख २५ हजार ९०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

गेल्या २४ तासांत मुंबईत ६ हजार ९२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. शहरात आतापर्यंत एकदाही इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आलेले नाहीत. आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील कोरोना मृतांचा आकडा ११ हजार ६४९ वर पोहोचला. मुंबईत आतापर्यंत ३ लाख ९८ हजार ६७४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ११ हजार ६४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांचा सातत्यानं वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

Web Title: Coronavirus vaccine : In india dr reddy lab expects sputnik v to get approval in india in next few weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.