शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या स्पाईक प्रोटीनला नष्ट करण्यास प्रभावी ठरेल 'ही' लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 16:33 IST

लसीच्या मदतीने संशोधक कोरोना विषाणूंच्या प्रोटीन्सची चेन नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 

कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस जगभरासह भारतातही वाढत चाललं आहे. वेगवेगळ्या देशांतील शास्त्रज्ञ कोरोनावर लस किंवा औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या चाचण्यांचा पहिला टप्पा यशस्वी झाला असून संशोधन सुरू आहे. असं सांगितले जात आहे की, लसीच्या मदतीने संशोधक कोरोना  विषाणूंच्या प्रोटीन्सची चेन नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 

अमेरिकेतील कंपनी नोवावॅक्सने ही लस तयार केली आहे. या लसीचे नाव NVX-CoV2373 आहे. भारत, चीन, इस्राईल, अमेरिका, ब्रिटेनसह अनेक देशांमध्ये लसीची चाचणी  सुरू आहे. एका रिपोर्टनुसार दक्षिणेतील देशात या लसीचे ट्रायल होणार असून कोरोना विषाणूंवर लस किती परिणामकारक ठरू शकते हे पाहण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूंशी लढणारी ही लस इन्फुंएंजा विषाणूंवर आधारीत आहे. त्याला नॅनोफ्लू असं म्हणतात.  या विषाणूची लस सुद्धा अमेरिकेतील नोवावॅक्स कंपनीने तयार केली होती. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये २ हजार ६५० लोकांवर या लसीचे ट्रायल करण्यात आले होते. हा लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा होता. 

लसीची प्रक्रिया

चाचणीमध्ये वापरात असलेली लस कोरोना विषाणूंवर सरळ आक्रमण करण्यापेक्षा विषाणूंच्या स्पाईक प्रोटीनवर आक्रमण करेल. विषाणूंमधलं हेच स्पाईक प्रोटीन रुग्णाच्या शरीरात संक्रमण पसरवण्यासाठी कारणीभूत ठरत असतं. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीमुळे व्यक्तीच्या इम्यून सिस्टिमच्या पेशींवर दबाव नियंत्रित राहील. जेणेकरून शरीराला व्हायरसशी लढता येईल.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसीमुळे व्हायरस प्रोटीन लहान लहान तुकड्यांमध्ये संपूर्णपणे नष्ट होईल. याला नॅनोपार्टीकल्स असं म्हणतात.  इम्यून सिस्टीम या पार्टिकल्सला सहज नष्ट करू शकते.

संशोधकांचं म्हणणं आहे की. कोरोनाच्या लसीत मेट्रिक्स-एम नावाचे नॅनो पार्टीकल्स असतील. त्याद्वारे शरीरातील विषाणूंचा धोका ओळखून इम्यून सिस्टीनला सिंग्नल देण्यात येईल. मग शरीरातील विषाणूंशी लढत असलेल्या पेशी व्हायरस प्रोटीन्सना संपवण्याासाठी फायदेशीर ठरतील.

'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा

मोठं यश! 'या' महिन्यात कोरोना विषाणूंची लस मिळणार; ३ देशात पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या