Coronavirus transmitted through air lancet study claims know preventions | Coronavirus transmitted through air : हवेच्या माध्यमातून वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; वेळीच जाणून घ्या बचावाचे उपाय

Coronavirus transmitted through air : हवेच्या माध्यमातून वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; वेळीच जाणून घ्या बचावाचे उपाय

मेडिकल जर्नल Lancet ने कोरोना व्हायरससंदर्भात धक्कादायक दावा केला आहे. हा घातक व्हायरस प्रामुख्याने हवेतून पसरतो आणि याचे ठोस पुरावेही आहेत, असे लॅन्सेटने म्हटले आहे. (America CoronaVirus is predominantly transmitted through air says lancet study on coronavirus) अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा सारख्या देशांतील 6 तज्ज्ञांनी दावा केला आहे, की हा व्हायरस हवेतून पसरत असल्यानेच मोठ्या प्रमाणावर सावधगिरी बाळगूनही आणि उत्तम प्रकारची आरोग्य सुविधा असतानाही त्याचा वेगाने प्रसार होत आहे.

तज्ज्ञांच्या या टीममध्ये CIRES (Cooperative Institute for Research in Environmental Sciences) केमिस्ट जोस लुइस जिमेनेज यांचेही नाव आहे. तज्ज्ञांनी म्हटले आहे, की त्यांना कोरोना व्हायरस हवेतून पसरत असल्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत आणि ही गोष्ट नाकारली जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या टीमनेही या रिसर्चची समीक्षा केली आहे आणि कोरोना व्हायरस हवेतून पसरत असल्याच्या दाव्याला हायलाइट केले आहे. महत्वाचे म्हणजे, केवळ मोठ्या ड्रॉपलेट्सपासूनच कोरोना पसरतो, याचे कुठलेही पुरावे नाहीत. हा व्हायरस हवेतून वेगाने पसरतो, हे सिद्ध झाले आहे, असेही या अभ्यासात म्हणण्यात आले आहे.

संपूर्ण जगात प्रामुख्याने हवेतून पसरला कोरोना’ - Lancet च्या अभ्यासात म्हणण्यात आले आहे, की 40 टक्के लोकांमध्ये, अशा लोकांपासून कोरोना पसरला, जे खोकत अथवा शिंकतही नाहीत. संपूर्ण जगात कोरोना पसरण्याचे मुख्य कारण हेच आहे. कारण हा व्हायरस प्रामुख्याने हवेच्या माध्यमाने परसला.

बचावाचे उपाय

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनसार कोरोनाचा प्रसार बंद जागेत, कमी व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी  अधिक प्रमाणात होतो. या अभ्यासानंतर आता प्रश्न उद्भवू लागले आहेत की कोणत्या उपाययोजनाद्वारे हवेद्वारे होणारे संक्रमण थांबविले जाऊ शकते? तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर एखाद्या संसर्गजन्य विषाणूचा प्रामुख्याने हवेतून प्रसार होत असेल तर एखाद्या संसर्गजन्य व्यक्तीचे बोलणे, ओरडणे, गाणे किंवा शिंका येणे दरम्यान बाहेर सोडल्या जात असलेल्या थेंबांमुळे अशी स्थिती उद्भवत असावी. 

अशा वातावरणात श्वास घेत हा व्हायरस इतर लोकांपर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत गर्दीच्या ठिकाणी न जाणं, मास्क वापरणे आणि लोकांकडून सामाजिक अंतर, लोकांना हवेच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी वेंटिलेशन, एअर फिल्टरिंग उपकरणांचा उपयोग करणं फायदेशीर ठरेल. 

 प्लाज्मा अन् रेमडेसिविरसाठी कसं, कोणत्या ठिकाणी अप्लाय करायचं?;  जाणून घ्या एका क्लिकवर

कॅलिफोर्नियामधील सॅन डिएगो विद्यापीठातील प्राध्यापक आणि अभ्यासक-सह-लेखक किंबर्ली प्रथम म्हणतात की हे आश्चर्यकारक आहे की अद्याप हा विषाणू हवेमार्फत पसरत आहे  याबद्दल प्रश्न उपस्थित आहेत. आता आपल्याला माहित झाले की हा विषाणू वायुमार्गात पसरू शकतो, म्हणून त्यावरील उपायांचा विचार करण्याची गरज आहे. जगातील सर्व देशांनी आता यावर वेगवान विचार करण्याची आणि या प्रकाराचा प्रसार थांबविण्याची गरज आहे.

 कोरोना झाल्यास लवकर बरं होण्यासाठी घरीच कशी घ्याल काळजी?; वाचा काय खायचं काय नाही

हवेतून संसर्गाची शक्यता ही बंद जागेत जास्त लोक जमल्यावरच असल्याने हे टाळावे.

 कामाच्या ठिकाणी शक्यतो दार, खिडक्या उघडी ठेवावी.

लग्नसमारंभ, धार्मिक स्थळ, बार अशा बंद जागेत जास्त गर्दी होते अशी ठिकाण जाणे टाळावे.

हवेतून संसर्गाची शक्यता गृहीत धरली तरी सर्वांनी मास्क वापरल्यास बचाव होईलच.

सोशल डिस्टन्सिंग पाळणे सुरू ठेवावे, या गोष्टी पाळल्या तर आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus transmitted through air lancet study claims know preventions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.