देशात कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये झपाट्यानं वाढ झालेली पाहायला मिळत आहे.  कोरोनामुळे दरदिवशी लाखो लोकांना संक्रमण  होत आहे. कोरोनाबाधित लोकांना लवकर बरं होण्यासाठी प्लाज्मा आणि रेमडेसिविरची खूप आवश्यकता आहे. भारतात रेमडेसिविरचा तुटवडा पडत असल्यामुळे सरकारनं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक अशा कठीण काळात लोकांची मदत करण्यास पुढे आले आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही वेबसाईड्सबद्दल सांगणार आहोत. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर आणि फेसबूक प्लॅटफॉर्मवर लोक प्लाज्मा डोनेशनसाठी मदत करत आहेत.  सगळ्यात पहिल्यांदा प्लाज्मा डोनेशनसाठी दिल्ली आणि आजूबाजूच्या परीसराला प्राधान्य देण्यात आलं आहे. या वेबसाईवर तुम्ही प्लाज्मासाठी निवेदन करू शकतात. जर तुम्हीही कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून पूर्ण बरे झाले असाल तर प्लाज्मा डोनेटही  करू शकता.

संपूर्ण भारतातून https://dhoondh.com या वेबसाईडवर रजिस्टर केलं जाऊ शकतं.  याठिकाणी तुम्ही प्लाज्मा डोनेट करू शकता किंवा घेण्यासाठी निवेदन करू शकता. http://plasmadonor.in/ ही वेबासाईट आता जवळपास १२ शहरांमध्ये सेवा देत आहेत. या बेवसाईटवर जाऊन प्लाज्माची उपलब्धता तुम्ही तपासून पाहू शकता.

http://needplasma.in/ आणि https://plasmaline.in/  या साईट्सवरही तुम्ही प्लाज्मासाठी अर्ज करू शकता. या वेबसाईट्सवर तुम्हाला प्लाज्मा मिळेलच असं नाही. पण तुम्ही निवेदन नक्कीच देऊ शकता. 
रेमडेसिविरच्या वितरणासाठी अनेक कंपन्या पुढे आल्या आहेत त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही रेमडेसिविर मागवू शकता. त्यासाठी तुम्ही सिपला या कंपनीत 8657311088  या क्रमांकावर तर हेट्रो कंपनीशी 040-40473535 कंपनीवर संपर्क करू शकता.येत्या ४-५ दिवसात मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार; कोविड-19 टास्क फोर्सची माहिती

 Jubiliant  ला  9819857718 या क्रमांकावर, मीलान कंपनीशी  7829980066  या क्रमांकावर संपर्क करू शकता. याशिवाय  info.availability@cipla.com , rc.kaushik@linde.com , vkas.bansi@jubl.com, kumar.subramaniam@mylan.in मेल अयाडीवर रेमडेसिविरबाबत विचारपूस करू शकता. याशिवाय युवा कॉंग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी,व्ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.  त्यांनी ट्विटरवर लोकांना मदतीचे आश्वासन दिलेले पाहायला मिळते. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे आमदार दिलीय पांडेय यांनी लोकांना आवश्यक औषधोपचार मिळण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. लस घेतली तरी कोरोना होतोच, मग कशासाठी घ्यायची लस?; डॉ. संजय ओक यांनी सांगितले अनुभवाचे बोल

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Apply for plasma and remdesivir: Corona apply for plasma and remdesivir on these places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.