शहरं
Join us  
Trending Stories
1
१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव
2
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
3
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
4
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
5
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
6
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर
8
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
9
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
10
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
11
दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! हिरव्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल
12
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
13
Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!
14
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
15
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
16
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
17
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
18
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
19
'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम
20
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

....म्हणून कोरोना संक्रमण झाल्यानंतर केस गळण्याची समस्या उद्भवते, तज्ज्ञांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 7:00 PM

CoronaVirus News & latest Updates: एका अभ्यासात कोरोनाच्या संक्रमणानंतर केस का गळतात याबाबत विश्लेषण करण्यात आलं आहे. 

कोरोना व्हायरसची लक्षणं प्रत्येकामध्ये वेगवेगळी दिसून येतात. सर्दी, खोकला, वास न समजणं,  तोंडाला चव जाणं, अंगदुखी, श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्यांचा सामना करावा लागतो. याव्यतिरिक्त कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर अजून एक समस्या उद्भवते, ती म्हणजे केस गळण्याची. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात कोरोनाच्या संक्रमणानंतर केस का गळतात याबाबत विश्लेषण करण्यात आलं आहे. 

या अभ्यासासाठी अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक, डॉक्टर नताली यांच्या टीमने जवळपास १५०० लोकांवर सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या दीर्घकाळ कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला होता. कोरोनातून  रिकव्हर झाल्यानंतरही अनेकांना केस गळण्याची समस्या उद्भवली होती.

संशोधकांना दिसून आलं की, केस गळणं हे कोरोनाच्या  २५ लक्षणांपैकी एक आहे. सर्वेक्षणात सहभाग असलेल्या लोकांनी सर्दी, उलट्या होणं यासह केस गळण्याच्या समस्येचा सामना केला. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार  या व्हायरसचं संक्रमण आणि केस गळणं यामधील सगळ्यात महत्वाचे कारण ताण तणाव आहे. कोणत्याही आजाराचा जास्त ताण घेतल्याने केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. 

या स्थितीला टेलोजेन एफ्लूवियम असंही म्हणतात टेलोजेन एफ्लूवियम या प्रकारत कोणताही आजार, मानसिक धक्का यांमुळे जास्त ताण तणाव येऊन केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. याव्यतिरिक्त संक्रमणादरम्यान शरीरात पोषक तत्वांची कमतरतता आढळून येते. त्यामुळे केस गळतात. दरम्यान कोरोना व्हायरस आणि केस गळणं यातील संबंधाबाबत अधिक चर्चा  सुरू आहे. दिलासादायक! भारतात १०० स्वयंसेवकांवर होणार स्पुटनिक-व्ही लसीची चाचणी, सरकारनं दिली परवानगी 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनमुसार या आजारापासून वाचण्यासाठी ताण तणावमुक्त आयुष्य  जगायला हवं. याशिवाय खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन योग्य आहार घ्यायला हवा. व्हिटामीन्स, प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते परिणामी काही दिवसांनी केस गळण्याची समस्या आपोआप दूर व्हायला सुरूवात होते. चिंताजनक! पुढची २० वर्ष कोरोना लसीची गरज भासणार, आदर पुनावालांनी सांगितले कारण...

कोरोनाच्या संक्रमणामुळे उद्भवतोय डायबिटीसचा धोका,रिसर्च

एका रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे लोकांना डायबिटीसची समस्या उद्भवत आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात लंडनचा रहिवासी असलेल्या २८ वर्षीय व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर तपासणी केल्यानंतर टेस्ट पॉझिटिव्ह आली. औषधोपचार  सुरू  केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा घडून आली. ऑगस्ट महिन्यात अचानक थकवा जाणवू लागला. त्यानंतर उलट्या होण्याचा  त्रास झाला.  त्यामुळे पुन्हा रुग्णालयातील भरती करण्यात आलं. त्यानंतर या व्यक्तीला आयसीयूमध्ये ठेवण्याची वेळ आली.

डॉक्टरांनी सांगितले की, वेळेवर या व्यक्तीला रुग्णालयात भरती केलं नसते तर मृत्यू होण्याची शक्यता होती. तपासणीदरम्यान दिसून आलं की, या व्यक्तीला टाईप १ डायबिटीसचा धोका उद्भवला होता. कोरोना संक्रमण होण्याआधी या व्यक्तीला डायबिटीजची समस्या नव्हती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संक्रमणामुळे डायबिटीसचा आजार उद्भवला होता. रुग्णात नवीन समस्या आढळल्यामुळे जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अनेक तज्ज्ञांनी हे मान्य केलं आहे की, रुग्णांना कोरोनाच्या संक्रमणानंतर ही डायबिटीसची समस्या उद्भवते. यावर अजून संशोधन सुरू आहे. अमेरिकेतील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफहेल्थमध्ये  याबाबत अधिक संशोधन सुरू आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या