शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दिलासा! मानवी चाचणीत कोरोना लसीचे सकारात्मक परिणाम; कधी तयार होणार लस, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 10:15 IST

CoronaVirus News & Latest Updates : AZD1222 ही लस परिक्षणच्या अंतीम टप्प्यात आहे. 

कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा सामना जगभरातील २१० पेक्षा जास्त देशांना करावा लागत आहे.  कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखणारी लस कधी उपलब्ध होणार याबाबत लोकांच्या मनात संभ्रमांचे वातावरण आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. पाच दिवसांत कोरोनाचे एक लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोणत्याही आजाराची लस तयार होण्यासाठी वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते. पण कोरोनाच्या लसीचे संशोधन  वेगाने सुरू आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत लस उपलब्ध होऊ शकते.  अशी आशा तज्ज्ञांना आहे. कोरोना लसीच्या चाचणीत ब्रिटेनची ऑक्सफोर्ड युनिव्हरर्सिटीची लस सगळ्यात पुढे आहे. कोरोनाच्या लसीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे.

कोरोनाची लस तयार करत असलेल्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मानवी चाचणीत या लसीचे सकारत्मक परिणाम दिसून आले आहेत. या युनिव्हर्सिटीतील वॅक्सीनोलॉजीच्या प्रोफेसर सारा गिल्बर्ट यांनी सांगितले की, AZD1222 ही लस परिक्षणच्या अंतीम टप्प्यात आहे. 

व्हायरसशी लढण्यासाठी ही लस परिणामकारक ठरू शकते.  रुग्णांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी ही लस प्रभावी ठरेल.  अंतीम टप्प्यातील परिक्षण आणि पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्यांचे निकाल याचे मुल्यांकन केले जात आहे.  सध्या १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांमध्ये ही लस परिणामकारक ठरेल की नाही. याशिवाय कोरोना रुग्णांची गंभीर स्थिती होण्यापासून वाचवण्यासाठी ही लस किती परिणामकारक ठरेल. याबाबत संशोधन सुरू आहे. 

दरम्यान युरोपात या वर्षाच्या शेवटापर्यंत कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत लस लवकरात लवकर तयार होणं गरजेचं आहे. ऑक्सफोर्डच्या लसीबाबत २०२१ च्या सुरूवातीला चांगली माहिती समोर येण्याची शक्यता आहे. वैज्ञानिकांनी कोरोनाची लस तयार होण्याबाबत एक निश्चित वेळेची माहिती दिलेली नाही. त्यांनी सांगितले की, लस कधी तयार होणार याबाबत आम्ही सांगू शकत नाही. पण लस विकसित होण्याची वेळ ही मानवी चाचणीवर अवलंबून असेल.

CoronaVirus : लढ्याला यश! भारतात बनवलेली कोरोनावरची पहिली लस 'या' दिवशी येणार बाजारात

दिलासादायक! भारत बायोटेक कंपनीची लस बाजारात कधीपर्यंत उपलब्ध होणार? जाणून घ्या

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय