शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

'त्या' औषधानं केली कमाल; ११४ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 3:37 PM

CoronaVirus Latest News Updates : यशस्वीरित्या कोरोनाला हरवून हे आजोबा घरी परतले आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालला आहे. कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान कोरोनाच्या माहामारीत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. एका  ११४ वर्षांच्या आजोंबानी कोरोनावर मात केली आहे.  इथोपियातील ११४ वर्षीय पारंपारिक बौद्ध भिक्षू असलेल्या आजोबांना कोरोनाची लागण  झाली होती. पण यशस्वीरित्या कोरोनाला हरवून हे आजोबा घरी परतले आहेत.  त्यांच्या कुटुंबातील लोकांनी ही माहिती दिली आहे. या आजोबांचे नाव तिलाहुन वुल्डेमायकल (Tilahun Woldemichael)  आहे. तीन आठवडे रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या आजोबांना घरी सोडण्यात आलं आहे.

कोरोना रुग्ण तिलाहुन वुल्डेमायकल यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना डेक्झामेथॅसोन हे औषध देण्यात आले. हे सहज उपलब्ध होणारे तसंच स्वस्त औषध आहे. या औषधाच्या वापराने इंग्लँडमधील मृतांची संख्या कमी झाली आहे. इथोपियाच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्रालयाने ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोविड 19 च्या रुग्णांना डेक्झामेथॅसोन देण्याचे आवाहन केले होते. 

तिलाहुन यांचा नातू लियुसेगेड याने सांगितले की, ''आमच्याकडे आजोबांचे बर्थ सर्टीफिकेट नाही, पण आजोबांच्या १०० व्या वाढदिवसाचे फोटो आहेत. आजोबांना कोविड 19 साठी रुग्णालयात भरती करण्यात आलं तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो.  पण आता  रुग्णालयातून आजोबा परत आल्यामुळे आमचं संपूर्ण कुटुंब आनंदी आहे. यानिमित्ताने आम्ही सगळे एकत्र आलो आहोत.'' माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार तिलाहुन १०० व्या वाढदिवसाच्या दिवशीही तरूण असल्याप्रमाणे दिसत होते. 

दरम्यान  जगभरात कोरोनाचा कहर अजूनही कमी झालेला नाही. कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी कोणतंही औषधं किंवा लस अद्याप तयार झालेली नाही. गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी केला जात आहे.  त्यात रेमडिसीवीर, डेक्झामेथासोन, फॅबीफ्लू यांसारख्या इतर औषधांचा समावेश आहे. सध्या लस तयार करण्यासाठी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीचे परिक्षण अंतीम टप्प्यात पोहोचले आहे. तर मॉर्डना आणि भारतातील सिरम इंडीया, सिपला या कंपन्याद्वारे परिक्षण सुरू आहे.  

काळजी वाढली! लस निष्क्रीय ठरण्याचं कारण असू शकतं कोरोना विषाणूंचे बदलतं स्वरुप

पावसाळ्यात डेंग्यूमुळे ताप आलाय की कोरोना विषाणूंचं संक्रमण झालं आहे; कसं ओळखाल?

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी