Coronavirus : खरंच डायबिटीसच्या रूग्णांना कोरोना संक्रमणाचा जास्त धोका आहे का? वाचा एक्सपर्ट काय म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 10:43 AM2021-06-25T10:43:28+5:302021-06-25T10:43:56+5:30

जे लोक आधीच डायबिटीसचे शिकार आहेत. ते कोरोनाचा धोका पाहून बरेच टेंशनमध्ये आहेत. डायबिटीसचे रूग्ण हे समजू शकत नाहीयेत की, अखेर एका सामान्य व्यक्तीच्या तुलनेत त्यांना कोरोनाचा धोका जास्त का आहे?

Coronavirus : Are diabetic patients really at higher risk of coronavirus, Expert told very important things | Coronavirus : खरंच डायबिटीसच्या रूग्णांना कोरोना संक्रमणाचा जास्त धोका आहे का? वाचा एक्सपर्ट काय म्हणाले

Coronavirus : खरंच डायबिटीसच्या रूग्णांना कोरोना संक्रमणाचा जास्त धोका आहे का? वाचा एक्सपर्ट काय म्हणाले

Next

भारतात कोरोना व्हायरसचं थैमान अजूनही सुरूच आहे. कोरोनाच्या नव्या रूग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा नव्या रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. सोबतच कोरोनामुळे मृत्यूमुखी पडत असलेल्या लोकांची संख्याही चिंतेचा विषय आहे. आतापर्यंत लोकांना हे समजून चुकलं आहे की, कोरोना व्हायरस डायबिटीसने पीडित रूग्णांना जास्त नुकसान पोहोचवत आहे. 

अशात जे लोक आधीच डायबिटीसचे शिकार आहेत. ते कोरोनाचा धोका पाहून बरेच टेंशनमध्ये आहेत. डायबिटीसचे रूग्ण हे समजू शकत नाहीयेत की, अखेर एका सामान्य व्यक्तीच्या तुलनेत त्यांना कोरोनाचा धोका जास्त का आहे? या प्रश्नाचं उत्तर मेदांता हॉस्पिटलचे Endocrinology & Diabetes डिपार्टमेंटचे डायरेक्टर डॉ. सुनील कुमार मिश्रा यांनी टीव्ही ९ सोबत बोलताना दिलं.

डॉ. सुनील कुमार मिश्रा यांनी सांगितलं की, अनेक मीडिया रिपोर्ट्स आणि वैज्ञानिक तथ्यांमधून समोर आलं आहे की, डायबिटीसच्या रूग्णांना कोरोना व्हायरसचा धोका जास्त आहे. कोरोनाने संक्रमित झाल्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रूग्णांमध्ये अशा रूग्णांची संख्या जास्त आहे ज्यांना डायबिटीस आहे. (हे पण वाचा : Coronavirus : रक्ताच्या गाठी तयार होऊन कोरोना रूग्णांचा मृत्यू का होतोय? वैज्ञानिकांनी सांगितलं कारण....)

डॉ. मिश्रा म्हणाले की, 'डायबिटीक लोकांमध्ये कोरोनाचा धोका जास्त आहे का? या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं आहे'. ते म्हणाले की, 'कोरोनाचं संक्रमण सर्वच लोकांमध्ये सारखं होतं. पण या आजारामुळे होणारे नुकसान डायबिटीसच्या रूग्णांना जास्त प्रभावित करतात'. 

ते म्हणाले की, 'कोरोनाने संक्रमित झाल्यावर एका डायबिटीसच्या रूग्णाला सामान्य रूग्णाच्या तुलनेत जास्त समस्या होते. हेच कारण आहे की,  लोकांना असं वाटतं की डायबिटीसच्या रूग्णांना कोरोनाचं संक्रमण होण्याचा धोका जास्त आहे. एकंदर असं सांगता येईल की, कोरोनाचं संक्रमण होण्याचा धोका सर्वांसाठी सारखा आहे. मात्र, संक्रमित झाल्यावर डायबिटीक लोकांना जास्त समस्या होतात'.

डॉक्टर पुढे म्हणाले की, जे लोक डायबिटीसने पीडित आहेत. त्यांना कोविड-१९ बाबत जास्त सतर्क राहण्याची गरज आहे आणि आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत ज्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज पडली, ज्यांना ऑक्सीजनची गरज पडली, ज्यांना आयसीयू आणि व्हेंटिलेटरची गरज पडली किंवा ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्यात डायबिटीक संक्रमित रूग्णांची संख्या नॉन-डायबिटीक संक्रमित रूग्णांच्या संख्येपेक्षा जास्त होती. 

'हाय शुगर लेव्हल, हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या कोणत्याही रूग्णात गंभीर समस्येचा धोका वाढवते. त्यासोबतच डायबिटीसच्या ज्या रूग्णांची शुगर लेव्हल अनियंत्रित झाली आहे, त्यांच्यासाठीही धोका जास्त आहे. तर ज्यांची शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये आहे, त्यांना धोका आहे पण कमी आहे.
 

Web Title: Coronavirus : Are diabetic patients really at higher risk of coronavirus, Expert told very important things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.