CoronaVirus : लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती घातक? एम्सचे संचालक डॉ. गुलेरियांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 06:17 PM2021-06-08T18:17:52+5:302021-06-08T18:19:16+5:30

गुलेरिया म्हणाले, रुग्ण संख्या कमी झाली, की अनलॉक होते आणि लोक निष्काळजी बनतात आणि पुढची लाट सुरू होते. जोवर अधिकांश लोकांचे लसीकरण होत नाही, तोवर आपल्याला सतर्कता बाळगावी लागेल.

CoronaVirus AIIMS Dr Guleria over corona third wave affect on children | CoronaVirus : लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती घातक? एम्सचे संचालक डॉ. गुलेरियांनी दिली माहिती

CoronaVirus : लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती घातक? एम्सचे संचालक डॉ. गुलेरियांनी दिली माहिती

Next


नवी दिल्ली - एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे, की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा डेटा नाही. यामुळे ही लाट मुलांसाठी किती घात असेल? हे सांगणे अवघड आहे. डॉ. गुलेरिया म्हणाले, व्हायरसमुळे या लाटा येतात, कारण व्हायरस आपले स्वरूप बदलतो. लॉकडाउनमुळे इंफेक्शन कमी होते. मात्र, लॉकडाउन उघडल्यानंतर इंफेक्शन वाढण्याची शक्यता आणखी वाढते. सध्य स्थितीत, असे कुठलेही तथ्य नाही, की ज्याच्या आधारे, पुढील लाट मुलांसाठीच येईल, असे सांगितले जाऊ शकेल. (CoronaVirus AIIMS Dr Guleria over corona third wave affect on children)

गुलेरिया म्हणाले, चेन ऑफ ट्रान्समिशन रोखण्यासाठी कोविड अॅप्रोप्रियेट बिहेविअर ठेवावे लागेल. आता चिंता, तिसरी लाट केव्हा येणार अथवा येऊ शकते आणि ती मुलांसाठी किती घातक असेल? याची आहे. स्पॅनिश फ्लू, एच1 एन1 मध्येही अशाच लाटा दिसून आल्या होत्या. जेव्हा व्हायरसमध्ये बदल होतो, तेव्हा लाट दिसून येते. 

फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन

गुलेरिया म्हणाले, रुग्ण संख्या कमी झाली, की अनलॉक होते आणि लोक निष्काळजी बनतात आणि पुढची लाट सुरू होते. जोवर अधिकांश लोकांचे लसीकरण होत नाही, तोवर आपल्याला सतर्कता बाळगावी लागेल. सध्या कुठल्याही देशात असा कुठलाही डेटा आलेला नाही, ज्यावरून मुलांना अधिक धोका आहे, असे सांगितले जाऊ शकेल. मात्र, पुढची लाट रोखण्यासाठी कोविड अॅप्रोप्रियेट बिहेविअरचे पालन करावेच लागेल असेही ते म्हणाले,

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, लोकांत आतापासूनच तिसऱ्या लाटेची भीती दिसत आहे. काही तज्ज्ञांचे मत होते, की तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरू शकेल. यामुळे मुलांचे पालक चिंतीत आहेत.

Corona Virus : कोरोनावर मात केलेल्यांसाठी लशीचा एकच डोस पुरेसा; BHUच्या वैज्ञानिकांचा मोठा दावा, PM मोदींना लिहिलं पत्र

आता डॉ. व्हीके पॉल यांच्या सारख्या आरोग्य तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात एक दिलासादायक बातमी दिली आहे. डॉ. व्हिके पॉल यांच्यासारख्या आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे, की कोरोनाची तिसरी लाट मुलांना अधिक प्रभावित करू शकते, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मागील डेटाही याचे समर्थन करत नाही. तसेच, मुलांच्या पालकांनी लस घेतल्यास, व्हायरस मुलांपर्यंत पोहोचू शकत नाही, असेही आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

Web Title: CoronaVirus AIIMS Dr Guleria over corona third wave affect on children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.