फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 10:06 AM2021-06-08T10:06:06+5:302021-06-08T10:10:10+5:30

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आता सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोविड-19 च्या लशीसाठी आवश्यक फोटो आयडीत यूनीक डिसॅबिलिटी आयडी कार्ड (UDID) चाही समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत.

Corona vaccination certificate for international travel check new guidelines | फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन

फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्र सरकारने परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी गाइडलाईन जारी केली आहे. ज्याला परदेशात जायचे आहे त्याला पहिल्या डोसच्या 28 दिवसांनंतर कधीही कोविशिल्डचा दुसरा डोस घेता येऊ शकतो. सर्वसामान्यपणे सरकारने कोविशील्ड लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचा गॅप ठेवला आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी गाइडलाईन जारी केली आहे. यानुसार, ज्याला परदेशात जायचे आहे त्याला पहिल्या डोसच्या 28 दिवसांनंतर कधीही कोविशिल्डचा दुसरा डोस घेता येऊ शकतो. मात्र, सर्वसामान्यपणे सरकारने कोविशील्ड लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचा गॅप ठेवला आहे.

गाइडलाईनमध्ये म्हणण्यात आले आहे, की परदेशात जाण्यासाठी केवळ कोविशील्ड लस घेतलेल्यांनाच व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट देण्यात येईल. या सर्टिफिकेटवर पासपोर्ट नंबरचाही उल्लेख असेल. यासाठी भारताची दुसरी लस कोव्हॅक्सिन क्वालिफाय करत नाही.

CoronaVaccine : Corbevax असू शकते देशातील सर्वात स्वस्त लस, केंद्र सरकारनं केली 30 कोटी डोसची प्री-बुकिंग

केवळ विशेष श्रेणीतील लोकांनाच सूट -
ही गाईडलाईन केवळ, 18 वर्षांवरील आणि 31 ऑगस्टपर्यंत परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठीच जारी करण्यात आलेली आहे. यात शिक्षणासाठी परदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी परदेशात जाणारे लोक, टोकियो ओलिम्पिक्स गेम्समध्ये सहभागी असलेले विद्यार्थी आणि त्यांच्या सोबत जाणाऱ्या स्टाफचा समावेश असेल.

सर्वसाधारणपणे कोविशील्डच्या दुसऱ्या डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांच्या गॅपचा नियम आहे. मात्र, या श्रेणीत परदेशात जाणाऱ्यांना लवकरही दुसरा डोस घेता येऊ शकतो. पहिला डोस घेऊन 28 दिवस झाले आहेत की नाही, यावर अथॉरिटी लक्ष ठेवेल. यासंदर्भात लवकरच कोवीन प्लॅटफॉर्मवरही विशेष व्यवस्था बघायला मिळेल.

Corona Virus : कोरोनावर मात केलेल्यांसाठी लशीचा एकच डोस पुरेसा; BHUच्या वैज्ञानिकांचा मोठा दावा, PM मोदींना लिहिलं पत्र

लसीकरणासाठी आता दिव्यांग फोटो ID ही चालणार - 
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आता सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोविड-19 च्या लशीसाठी आवश्यक फोटो आयडीत यूनीक डिसॅबिलिटी आयडी कार्ड (UDID) चाही समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत. लशीसाठी कुठल्याही पद्धतीने रजिस्‍ट्रेशन करण्यापूर्वी ओळखपत्र दिखवावे लागते. अशात अता दिव्यांग व्यक्ती यूडीआयडी दाखवून लसीकरणाचा लाभ घेऊ शकतात.
 

Read in English

Web Title: Corona vaccination certificate for international travel check new guidelines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.